तनपुरे कारखान्याचा बॉलयर नाही पण संघर्ष पेटला
तनपुरे साखर कारखाना

तनपुरे कारखान्याचा बॉलयर नाही पण संघर्ष पेटला

अहमदनगर : राहुरीतील तनपुरे कारखान्याचे आंदोलन आता चिघळण्याच्या स्थितीत आहे. गेल्या दहा दिवसांपासून थकीत वेतनासाठी कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. कारखाना व्यवस्थापन कोणतीच दखल घेत नसल्याने त्यांनी कालपासून वेगळे पाऊल उचलले आहे. हा कारखाना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यशस्वीपणे चालविला. परंतु आता हा कारखाना बंद आहे. कामगारांचे प्रपंच थकीत पगाराअभावी देशोधडीला लागले आहेत.Anger of Tanpure sugar factory workers against Vikhe

एकेकाळी ऐश्वर्यसंपन्न असलेल्या या कारखान्याची वसाहत विपन्नावस्थेत आली आहे. तनपुरे यांच्या नावाने असलेला हा कारखाना प्रसाद तनपुरे यांच्या ताब्यात होता. नंतर विखे पाटील आणि धुमाळ यांची कारखान्यात सत्ता आली. त्यानंतर तनपुरे यांनी कारखान्यातून अंग काढून घेतले. वांबोरी येथे त्यांनी स्वतःचा खासगी प्रसाद शुगर कारखाना उभारला. नंतरच्या काळात शिवाजीराव कर्डिले आमदार असताना त्यांनी कारखान्याला मदत केली. जिल्हा बँकेतून कर्ज मिळवून दिले. विरोधी गटाला विखे पाटील यांनी ताकद देत कारखाना सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला.

तनपुरे साखर कारखाना
रोहित पवार म्हणाले, राणे मोठे नेते, मी काय बोलू...

या कारखान्याच्या मालकीचे श्री विवेकानंद नर्सिंग होम, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, श्री लक्ष्मीनारायण औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ट्रस्ट, पेट्रोल पंप आहे. या संस्थांमध्ये सुबत्ता आहेत. विखे पाटील यांनी कारखाना चालविण्यासाठी घेतल्यानंतर त्यांनी त्यांचे अधिकारी आणि कर्मचारीही आणले. ते या इतर संस्थांमध्ये रूजू झाले. या संस्थांना मान्यता असल्याने त्यांचे वेतन नियमित होत आहे.

आता मूळ संस्थाच बंद पडली असल्याने कारखान्यातील कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या कारखान्यात बहुतांशी कामगार हे राहुरीतील आहेत. विखे पाटील यांच्याकडून कोणतेच ठोस आश्वासन मिळत नसल्याने त्यांनी प्रवरेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरूद्ध आवाज उठवला आहे.

तुम्ही या संस्थांमध्ये घुसखोरी करायची नाही, असा दम कामगार त्यांना भरत आहेत. तनपुरे साखर कारखान्याचे दोनशे कामगार मागील पाच वर्षांतील थकीत वेतन व इतर २५ कोटी ३६ लाखांच्या मागणीसाठी आंदोलने करीत आहेत. Anger of Tanpure sugar factory workers against Vikhe

राहुरी कारखान्याच्या कामगारांना सापत्न वागणूक मिळत आहे. प्रवरेचे कामगार तुपाशी, तर राहुरीचे कामगार उपाशी आहेत. तुमचा काहीच उपयोग नाही, त्यामुळे तुम्ही इथून निघून जा, असा इशारा कामगार नेते इंद्रभान पेरणे यांनी दिला आहे. या आंदोलनात कामगारांची मुलेही उतरली आहेत. पगारच मिळत नसल्याने चूल पेटवणे मुश्कील झाले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com