माझी डिग्री व मला विकणे आहे; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची संतप्त भावना  

विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा
माझी डिग्री व मला विकणे आहे; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची संतप्त भावना  
माझी डिग्री व मला विकणे आहे; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची संतप्त भावना  सुरेंद्र रामटेके

सुरेंद्र रामटेके

 वर्धा : स्पर्धा परीक्षेच्या मुद्द्यावरून आज वर्धा येथे विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून आक्रोश मोर्चाला सुरवात करत जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले , माझी डिग्री विकणे आहे, मला विकणे आहे, अश्या आशयाचे फलक हाती घेत विद्यार्थ्यांनी  संताप व्यक्त केला आहे.

हे देखील पहा

पोलीस भरती जाहीर करा तसेच एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले, कोरोनामुळे स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकात मोठे बदल झाले आहेत, पुढे ढकलण्यात आलेल्या काही परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत, महापरीक्षा पोर्टलवर सोळा प्रकारच्या परीक्षेचे फॉर्म भरून घेण्यात आले आहेत .

माझी डिग्री व मला विकणे आहे; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची संतप्त भावना  
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठी युवकांनो आपला बी प्लॅन तयार ठेवा..

एमआयडीसीची असो किंवा आरोग्य सेवक, पोलीस भरती अशा विविध पदांची अद्याप भरती झालेली नाही ती त्वरित व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय, वेळेत नियुक्ती न झाल्याने काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती, त्यामुळे पुन्हा असे स्वप्नील होऊ देऊ नका अशी आर्त विनवणी विद्यार्थ्यांनी शासनाला केली आहे.

Edited By - Ashwini jadhav kedari

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com