'ईडी' त नव्हे अनिल परब पाेहचले शिर्डीत, म्हणाले...

अनिल परब हे राज्यातील विविध जिल्हा दाै-यावर आहेत. मंगळवारी ते नाशिक दाै-यावर हाेते.
'ईडी' त नव्हे अनिल परब पाेहचले शिर्डीत, म्हणाले...
Anil Parab, enforcement directorate, nashik, mumbaiSaam TV

- तबरेज शेख

नाशिक (anil parab latest marathi update) : परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांना ईडीने (ED) चौकशीसाठी आज (बुधवार) ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र अनिल परब हे त्यांच्या पुर्वनियाेजीत कार्यक्रमांमुळे ईडी कार्यालयात गेले नाहीत. स्वतः परब यांनी आज शिर्डीत (shirdi) पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची माहिती माध्यमांना दिली. (anil parab latest marathi news)

माध्यमांशी बाेलताना अनिल परब म्हणाले मी मंगळवारी नाशिकला आलो होतो. आज शिर्डी येथे आलाे आहे. आज साईंचे दर्शन घेतले आहे. मला इडीची नोटीस कालच मिळाली आहे. मी मुंबईच्या बाहेर असल्याने आज ईडीच्या कार्यालयात जाऊ शकलो नाही. याबाबत ईडीच्या कार्यालयास कल्पना दिली आहे. मुंबईत (mumbai) गेलो की मी जाणार आहे. यापुर्वीही देखील मी दोनदा चौकशीला सामोरे गेलो आहे असेही परब यांनी नमूद केले.

Anil Parab, enforcement directorate, nashik, mumbai
खेलो इंडियातील खेळाडूंसाठी 'साई' देणार पॉकेटमनी; २१८९ खेळाडूंसाठी ६.५२ कोटींची तरतूद

परब म्हणाले ईडी प्रशासन जे जे प्रश्न विचारतील त्याची उत्तरं देण्यास मी बांधील आहे. किरीट सोमय्याला (kirit Somaiya) यांस उत्तर देण्यास मी बांधील नाही. किरीट सोमय्याला मला काही विचारण्याचा अधिकार नाही. ज्या एजन्सीला अधिकार आहे त्यांना उत्तरं देत आलोय. यापुर्वीही उत्तरे दिलीत यापुढेही देत राहीन. मला जी प्रश्न विचारली जाताहेत त्याची उत्तरं मी देतोय. माझ्यावर जे आरोप करताहेत त्यांनी आरोप करावे. आरोपांची चौकशी करून काय निष्पन्न होतं ते पहावं असे ही मंत्री परब यांनी स्पष्ट केले.

Anil Parab, enforcement directorate, nashik, mumbai
हाॅस्टेलमध्ये माधूरीने गळफास घेऊन केली आत्महत्या; टोपले कुटुंबिय शाेकसागरात

दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी साईबाबांच्या (sai baba) मध्यान्ह आरतीला हजेरी लावली हाेती. साईबाबांच्या दर्शनानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

Edited By : Siddharth Latkar

Anil Parab, enforcement directorate, nashik, mumbai
हद्दच झाली राव! खासदार, आमदारांनी बाेलाविलेल्या बैठकीत अधिकारी खेळत हाेते कॅंडी क्रश
Anil Parab, enforcement directorate, nashik, mumbai
Jee Main 2022 : जेईई मुख्य परीक्षेसाठी नव्या तारखा जाहीर; असे करा प्रवेशपत्र डाउनलाेड

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com