
रत्नागिरी : राज्यात तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं असलं तरी, स्थानिक ठिकाणच्या राजकारणामध्ये या तीन्ही पक्षांतर्ग असलेली धुसफूस या ना त्या कारणाने सतत दिसत असते. शिवाय रत्नागिरी, रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी (Shivsena and NCP) हा वाद सर्वश्रुत आहे. याचाच प्रत्यय शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला आहे.
रत्नागिरीत (Ratnagiri) शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमिवर झालेल्या बैठकीत पाच तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. अनिल परब (Anil Parab) राष्ट्रवादी काँग्रेसला कामं देतात आणि शिवसेनेच्या लोकांना डावलतात असा आरोप पक्ष निरीक्षक सुधीर मोरे आणि शरद बोरकर यांच्या समोर चिपळूणमधील पुष्कर हॉलमध्ये पार पडली बैठकीत सेना पदाधिकाऱ्यांनी केला.
हे देखील पाहा -
जवळपास चार तास पार पडलेल्या या बैठकीत पालकमंत्री अनिल परब आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्या बद्दल नाराजीचाच सूर होता. नाराज पदाधिकारी म्हणाले, पालकमंत्री फक्त झेंडा वंदन आणि दापोलीत राजकारण करण्यासाठी येतात. इतर वेळी ते जिल्ह्यात दिसत नाहीत. दरम्यान, यावेळी चिपळूण ,गुहागर,खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी संतापले होते, या आक्रमक पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नासमोर पक्ष निरीक्षक मात्र निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळालं.
Edited By -Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.