स्वतःच स्थापन केलेल्या सैनिक बँकेची अण्णांनी लावली चौकशी

स्वतःच स्थापन केलेल्या सैनिक बँकेची अण्णांनी लावली चौकशी
Anna Hazare

मार्तंड बुचुडे

पारनेर ः सहकार क्षेत्रातील संस्था तसेच बँकांमधील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक असतात. त्यांनी पारनेर सैनिक सहकारी बँकेची स्थापना करून पाच वर्षे अध्यक्षपद भूषविले. त्याच बँकेची चौकशी करावी, अशी लेखी मागणी त्यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार नाशिकचे विभागीय सहनिबंधक आर. सी. शाह यांच्यामार्फत बँकेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

याबाबत हजारे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘‘नादान संचालकांनी एकत्र येत बँकेत भ्रष्टाचार सुरू केला. बँकेत पुन्हा निवडून यावे, यासाठी सभासद वाढविण्याचा घाट घातला, तसेच बेकायदा अध्यक्ष व संचालक, त्यांच्या नातेवाइकांच्या, मुलांच्या नेमणुका केल्या. याबाबत पुराव्यासह सहकार आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानुसार बँकेची चौकशी सुरू झाली.’’ Anna Hazare demanded an inquiry into Sainik Sahakari Bank

Anna Hazare
तब्बल एक एकर जमीन गेली चोरीला!

‘‘बँकेतील पैसा जनतेचा आहे. त्याचे संरक्षण करणे संचालकांचे कर्तव्य आहे; मात्र त्यांनी चुकीचे काम केले आहे. अनेक आजी-माजी सैनिकांनी बँकेची स्थापना करण्याची मागणी केल्यानंतर मी सैनिकांच्या कल्याणासाठी व हितासाठी रिझर्व्ह बँकेकडून परवाना आणून बँकेची स्थापना केली. सैनिकांच्या आग्रहाखातर पहिली पाच वर्षे अध्यक्ष राहिलो. त्यानंतर मी निवडणूक लढविली नाही, तसेच बँकेत पायही ठेवला नाही. बँकेला उज्ज्वल भविष्य लाभावे, अशी माझी इच्छा होती; मात्र भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्याने दुःख झाले. त्यामुळे आपण सहकार आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली.

ज्या हेतूने बँक सुरू केली, त्यास काही संचालकांनी हरताळ फासला. चौकशीनंतर या बाबी उघड होतील. मात्र, ही मंडळी दोषी असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे,’’ असेही हजारे या वेळी म्हणाले.

पैसा कधीही येईल; चारित्र्याचे काय?

विद्यमान अध्यक्ष व काही संचालक माझ्याकडे येऊन गेले. त्यांनी मला ‘आमचे म्हणणे ऐकून घ्या,’ अशी विनंती केली. त्यावेळी मी त्यांना ‘चौकशी सुरू झाली आहे. चौकशीदरम्यान काय सांगायचे ते सांगावे. चौकशीत काय खरे व काय खोटे ते सिद्ध होईल,’ असे सांगितले. पैसा आज आहे उद्या नसेलही; मात्र चारित्र्य सर्वांत महत्त्वाचे आहे, असे अण्णा हजारे यांनी सांगितले.Anna Hazare demanded an inquiry into Sainik Sahakari Bank

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com