अण्णा हजारे चिडले, उगाच काहीही छापू नका...

Anna Hazare
Anna HazareSaamtv

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कथित वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. काही वर्तमानपत्रांनी उगाचच न बोलली वक्तव्य अण्णांच्या तोंडी घातली आहेत. त्यामुळे अण्णा चिडले आहेत. संबंधित वर्तमानपत्राचे त्यांनी बौद्धिक घेतले आहे.

‘नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात : अण्णा हजारे’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत अण्णांनी प्रसिद्धीपत्रक काढून मत व्यक्त केले आहे.Anna Hazare denies statement about teachers abn79

Anna Hazare
चंद्रकांतदादांची पाठ फिरताच भाजपचे "चाणक्य" राष्ट्रवादीत

यापूर्वीही अनेकदा माझ्याबद्दल आणि जन आंदोलनाबद्दल चुकीच्या व खोट्या बातम्या, लेख आले आहेत. अशीच एक खोटी बातमी छापल्याबद्द्ल कायदेशीर नोटीस बजावली होती. ही नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. आता पुन्हा त्यांनी अशीच खोटी बातमी छापून शिक्षक, पालक व विद्यार्थी वर्गामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलाय, असंही त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.

शिक्षकांविषयी मला आदरभाव आहे. तेच भावी पिढी घडवित असतात. त्यांच्याविषयी मी असे वक्तव्य करणे शक्य नाही. उगाच माझ्या तोंडी खोटी वाक्य टाकून संभ्रम निर्माण केला आहे. काही अविचारी लोक समाजात दुही, द्वेषभावना आणि तेढ निर्माण होईल असा प्रयत्न सातत्याने करीत आहेत.Anna Hazare denies statement about teachers abn79

शिक्षकी पेशा हा एक पवित्र पेशा आहे. शिक्षकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. तसेच गैरसमज करून न घेता आपले ज्ञानदानाचे पवित्र काम सुरू ठेवावे. समाजानेही जागरुक राहून अशा प्रवृत्तींना थारा देऊ न देता समाजातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील कसे राहिल याचा विचार करावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com