शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचं अण्णा हजारेंकडून समर्थन; म्हणाले, लोकशाही टिकवण्यासाठी सरपंच...

एकनाथ शिंदे सरकारच्या भूमिकेचं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समर्थन केलं आहे.
Anna Hazare News
Anna Hazare NewsSaam TV

अहमदनगर: देशात लोकशाही टिकवायची असेल तर गावातला सरपंच हा गावकऱ्यांनीच निवडावा असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी व्यक्त केले आहे. राळेगणसिद्धीमध्ये आयोजित सरपंच परिषदेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा घेतलेला निर्णय महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच रद्द करुन पुन्हा ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, राज्यात एकनाथ शिंदे गटाने केलेली बंडखोरीनंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. याच शिंदे सरकारच्या भूमिकेचं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समर्थन केलं आहे.

लोकशाही बळकट करून गावातील रोजगार वाढवण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेतला पाहिजे असं मत आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार यावेळी केली.

Anna Hazare News
Breaking News : पुणकरांनो लक्ष द्या! चांदणी चौकातील पूल पाडण्याचा दिवस अखेर ठरला

थेट जनतेतून सरपंच व्हावा ही सरपंच परिषदेची मागणी होती. कारण गावागावात जातीपातीचे राजकारण सरपंच निवडीच्या वेळेस पळवा पळवी त्यातून होणाऱ्या हाणामाऱ्या यामुळे राज्यातील अनेक तरुण सरपंचावर गुन्हे दाखल झाले होते. म्हणून गावातील गुंडगिरी संपवण्यासाठी आम्ही ही मागणी केली होती असे सरपंच परिषदेचे अध्यक्ष काकडे यांनी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com