मराठा युवकांसाठी समरजीतराजे घाटगेंचा महत्वपुर्ण पुढाकार

मराठा युवकांसाठी समरजीतराजे घाटगेंचा महत्वपुर्ण पुढाकार
annasaheb patil arthik vikas mahamandal maryadit

कोल्हापूर : मराठा समाजातील maratha community तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची annasaheb patil arthik vikas mahamandal कर्जे सुलभ रित्या मिळावीत म्हणून कोल्हापूरला 22 सहकारी बँकांचा समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीतराजे घाटगे यांच्या पुढाकाराने हा कक्ष सुरू करण्यात आला. राज्यात पहिल्यांदाच अशाप्रकारे कक्ष स्थापन करण्यात आला आहे. (annasaheb- patil-arthik-vikas-mahamandal-coordination-office-kolhapur)

कोल्हापूरातील लक्ष्मीपुरीतील राजे विक्रमसिंह घाटगे को ऑप बँकेच्या शाखेत हा कक्ष सुरु करण्यात आला आहे. मराठा समाजातील युवकांना उद्योगासाठी लागणाऱ्या कर्ज देणं आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कक्षातून इतर व्यवसायिक कर्जासाठी ही मार्गदर्शन केली जाईल असे स्पष्ट करण्यात आला आहे.

या कक्षाचे उद्घाटन समरजीत घाटगे, युथ सहकारी बँकेचे चेअरमन चेतन नरके यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सारथी संस्थेतून कौशल्य विकास योजना राबविण्यात यावी अशी मागणी समरजीतराजे घाटगे यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com