संतापजनक! खाजगी चालकाने दारु पिऊन चालवली शिवशाही बस...

पुण्याहून औरंगाबाद दरम्यान दारू पिलेल्या खासगी शिवशाही बसच्या चालकाने भरधाव बस चालवून ३० प्रवाशांना त्रस्त करून सोडले.
संतापजनक! खाजगी चालकाने दारु पिऊन चालवली शिवशाही बस...
संतापजनक! खाजगी चालकाने दारु पिऊन चालवली शिवशाही बस...माधव सावरगावे

औरंगाबाद: एकीकडे एसटीचे खाजगीकरण करू नका, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या आणि एसटी महामंडळाचे विलीनीकरण करा अशी मागणी सुरू आहे. तर दुसरीकडे एसटी महामंडळातील एका खाजगी शिवशाही चालकाने दारू पिऊन ३० प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार समोर आलाय. पुण्याहून औरंगाबाद दरम्यान दारू पिलेल्या खासगी शिवशाही बसच्या चालकाने भरधाव बस चालवून ३० प्रवाशांना त्रस्त करून सोडले. घाबरलेल्या आणि संतापलेल्या प्रवाशांनी औरंगाबादमध्ये आल्यानंतर थेट डेपो मॅनेजरकडे तक्रार केली. (Annoying! Shivshahi bus driven by a private driver while drunked)

हे देखील पहा -

ही घटना रविवारी घडली. पुण्याहून येणाऱ्या एमएच ०४ जेके ३१५७ या शिवशाही बसच्या ड्रायव्हरने अहमदनगरमध्ये बस थांबवून दारू पिली. त्यानंतर चार प्रवाशांना विनतिकीट बसविले. घोडेगाव येथे दोन महिला प्रवाशांना बसविले. या महिलांनी एका प्रवासी महिलेची बॅग चोरण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अन्य प्रवाशांनी पाहिल्यानंतर त्या महिला नेवासा फाटा येथे उतरल्या. त्यानंतर चालकाने नेवासा फाटा येथे उतरून पुन्हा दारू पिली. चालक वेगाने बस चालवीत होता, असे प्रवाशांनी सांगितले. ही बस रात्री ९ वाजता मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचली. तेव्हा प्रवाशांनी संताप व्यक्त करीत आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केली.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com