"नागवडे"च्या उद्याच्या सभेकडे लागले सर्वांचे लक्ष

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

अहमदनगर : नागवडे सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या मंगळवारी (ता. २८) अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष युवराज चितळकर यांनी दिली. दरम्यान ही वार्षिक सभा निवडणुकीपूर्वीची शेवटची असल्याने सभासदांचे या सभेकडे लक्ष लागले आहे.

पत्रकात चितळकर म्हणाले की, कारखान्याची ५६ वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी २ वाजता व्हिडिओ काॅन्फरन्सिंग पध्दतीने ऑनलाईन सुरू होईल.

प्रातिनिधिक छायाचित्र
"रोहित दादा तुम्ही माणूस हाय लय ग्रेट..." ओ शेठच्या गायकाची पावती

सभेच्या विषय पत्रिकेवर एकूण नऊ विषय आहेत. यामध्ये मागील अधिमंडळ सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, संचालक मंडळाने सादर केलेला २०००-२१ चा अहवाल स्वीकारणे, अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे, वैधानिक लेखापरिक्षक, कर सल्लागारांची नेमणूक करणे, सन-२०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या महसुली व भांडवली खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे, वार्षिक सभेस अनुपस्थित असलेल्या व्यक्ती व संस्था सभासदांची अनुपस्थिती क्षमापिक करणे या महत्वाच्या विषयांचा समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार कारखान्याची अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनासंबंधी नियमांचे पालन करुन पार पाडली जाणार आहे. सभासदांनी या व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे होणा-या सभेत https://www.vcnowevents.in/SMSNNSSK55/ या लिंकवरुन ऑनलाईन पध्दतीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चितळकर, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com