Nashik Shivsena : नाशकात ठाकरेंना पुन्हा धक्का; विश्वासू पदाधिकारी शिंदे गटात

एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिलाय.
Nashik Shivsena News
Nashik Shivsena NewsSaam TV

Shivsena Crisis Latest News : एकनाथ शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष सुरू झाला. शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील (Shivsena) अनेक नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अशातच नाशिकमध्ये (Nashik) सुद्धा एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिलाय. (Nashik News Today)

Nashik Shivsena News
Maharashtra Politics : मुंबई जिंकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा नवा प्लॅन; ठाकरेंना धक्का?

नाशिकमधील शिवसेनेचे पदाधिकारी अनिल ढिकले आणि भाऊलाल तांबडे यांनी शिंदे गटाची (Eknath Shinde) वाट धरली आहे. दरम्यान, शिंदे गटात प्रवेश करताच अनिल ढिकले यांची नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुखपदी तर भाऊलाल तांबडे यांची दिंडोरी ग्रामीणच्या जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ही नियुक्ती केली आहे.

सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी आपल्या पक्षाची शाखा गावागावात उघडा अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर येत्या काही काळात निश्चितच गाव तिथे आपल्या पक्षाची शाखा दिसेल अशी ग्वाही यावेळी खासदार गोडसे यांनी दिली आहे. (Maharashtra Politics News Today)

Nashik Shivsena News
Sanjay Raut : संजय राऊतांची सुटका होणार? जामीन अर्जावर आज सुनावणी

मुंबईत शिंदे गटाचा भाजपला धक्का!

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपला एक झटका बसला आहे. कारण, मुंबईतील 100 हून अधिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या 100 हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरातील प्रभाग क्रमांक 25 च्या भाजप माजी वॉर्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासोबत 100 महिलाांनी शिंदे गटाला समर्थन देत प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com