वरकुटे- म्हसवडच्या तलाठ्याने २ हजार घेतले; ACB ने पकडले

वरकुटे- म्हसवडच्या तलाठ्याने २ हजार घेतले; ACB ने पकडले
bribe

सातारा : वडिलोपार्जित शेत जमिनीवर वारसदार नाव नोंद करून तसा सात बारा उतारा देण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी करून दाेन हजार रुपये लाच bribe स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक anti corruption bureau विभागाने तलाठी दादासो अनिल नरळे यास आज (गुरुवार) रंगेहात पकडले. वरकुटे- म्हसवड तलाठी कार्यालयात नरळेवर सापळा रचण्यात आला हाेता अशी माहिती एसीबीच्या कार्यालयातून देण्यात आली.

नरळे राहणार पाणवण (ता. माण) याच्या विराेधात तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली हाेती. त्यानूसार त्याची आज पडताळणी करण्यात आली. त्यानंतर नरळेवर एसीबीने सापळा रचला. त्यात ताे दाेन हजार रुपये घेताना सापडला.

 bribe
भारतीय क्रीडाप्रेमींना बसला धक्का; जलतरणपटू सुयश जाधव ठरला अपात्र

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपधीक्षक अशोक शिर्के, पोलिस नाईक विनोद राजे, कॉन्सेटबल संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले या पथकाने त्याच्यावर कारवाई केली. या पथकास लाच लुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com