Bhosari Land Scam| भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी 'एसीबी'कडून पुन्हा कोर्टात अर्ज दाखल; खडसे म्हणाले...

राज्यात सत्तापालट होताच खडसेंच्या मागे चौकशींचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. या चौकशी अर्जानंतर यावर आता जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath shinde
Eknath shinde saam tv

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खडसे यांची भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे. खडसे यांची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा चौकशीसाठी अर्ज कोर्टात केला आहे. खडसे यांना २०१८ मध्ये 'क्लीन चिट' मिळाली होती. मात्र, राज्यात सत्तापालट होताच खडसेंच्या मागे चौकशींचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. या चौकशी अर्जानंतर यावर आता जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Khadse News In Marathi)

Eknath shinde
Eknath Shinde | CM शिंदे यांचं आनंद दिघे यांच्यावर मोठं विधान; ' त्यांच्यासोबत काय झाले, त्याचे...'

एकनाथ खडसे म्हणाले, 'भोसरी जमीन प्रकरणी दोन वेळा 'एसीबी'ने चौकशी केली, ईडीने चौकशी केली. कोर्टात क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतरही पुन्हा चौकशी करण्याचं प्रयोजन काय ? निर्दोष सिद्ध झालेलो असतानाही वारंवार चौकशी करून माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे'. राज्यात सरकार बदलल्यानंतर मला छळण्यासाठी हे केलं जात आहे, असा आरोप खडसे यांनी शिंदे सरकारवर केला आहे.

Eknath shinde
Arjun Khotklar : दानवेंना म्हटलं, यावेळी मला लोकसभा लढू द्या; खोतकर काय म्हणाले? वाचा...

दरम्यान, एकनाथ खडसे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोर्टात चौकशीची मागणी केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'आज भोसरी जमीन घोटाळा प्रकरण कोर्टात होतं. त्यात आज अचानकपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांची पुन्हा चौकशी करण्याचा अर्ज कोर्टात केला आहे. आमचं देखील हेच म्हणणं होतं. २०१८ सालापासून आम्ही ही केस लढतोय.'

'माझे वकील असीम सरोदे हे सदर केस लढत आहेत. मुळात या प्रकरणाची चौकशी नीट झाली नव्हती. क्लिन चिट बोगस होती. अनेक शेल कंपन्यातून पैसै हे मंदाकिनी खडसे यांच्या खात्यात आले. हे मी म्हणत नाही, ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात नमूद आहे. हेच आम्ही आधीपासून म्हणतोय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निर्णयाचं मी स्वागत करते. दुसरीकडे भाजपने एसीबी आणि ईडी या यंत्रणेचा वापर नेत्यांना पक्षात आणण्यासाठी करू नये. भ्रष्टाचाराची लढाई लावून धरली पाहिजे, तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकले पाहिजे', असेही दमानिया यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com