
संजय राठोड
Yavatmal News: मोठ्या शहरांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन काही मुले महिलांसह मुलींना वाईट उद्देशाने स्पर्श करण्याचा प्रकार सर्रास घडतो. मात्र आता गर्दीत महिला,मुलींना एकटी पाहून तिला छेड काढण्याचा विचार करीत असाल तर सावधान. कारण यवतमाळच्या पुसद येथील इलेक्ट्रॉनिक इंजिनियर युवकाने महिलांवरील वाढत्या अत्याचाराला पायबंध घालण्यासाठी अँटी रेप सेफ्टी सिस्टीम विकसित केली आहे. (Latest Marathi News)
कोणत्याही चुकीच्या कृतीचा संबंध जेव्हा एखादा व्यभिचारी एखाद्या महिलेला चुकीचा स्पर्श (Bad Touch) करतो तेव्हा त्याला सिस्टममधून विद्युत प्रवाहाचा त्याच्या शरीराला जोरदार झटका मिळेल व पुन्हा स्पर्श करण्याची हिम्मत करणार नाहीत. त्याचवेळी या जॅकेटमधील जीएसएम सिस्टीम त्या महिलेच्या घरी फोन कॉलिंग करेल. त्यामुळे ती व्यक्ती नक्कीच तेथून पळून जाईल. अॅटी रेप सेफ्टी सिस्टम नेमकं कसं काम करतं याची माहिती जाणून घेऊ.
महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत पुसद येथील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर अजय विश्वकर्मा यांनी अॅटी सेफ्टी सिस्टीम विकसित केली आहे. त्यांचा हा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. ही सुरक्षा प्रणाली महिलांना त्यांनी समर्पित केली आहे. वाईट उद्देशाने कुणी या महिलेला स्पर्श केल्यास यातील हाय फ्रिक्वेन्सी करंटचा जोरदार झटका बसतो.
अचानकपणे बसलेल्या झटक्याने असा व्यक्ती भांबावून दूर पळतो व महिलेचा वाईट घटनेपासून बचाव होतो. महिला त्यांच्या कार्यालयातून रात्री उशिरा घरी पोहोचतात त्यांची काळजी घेण्यासाठी ही डिझाईन तयार केलेली आहे. महिलांनी हे सेफ्टी जॅकेट परिधान केल्यावर नक्कीच सुरक्षित वाटेल अशी अजय यांची अपेक्षा आहे.
अजय यांनी नागपूर येथील इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स या संस्थेमधून डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक कोर्स केलाय. त्यांनी विकसित केलेली अँटी रेप सेफ्टी अॅप्रेन पूर्णपणे सुरक्षित आहे. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर ही सिस्टीम दोन हजार तास सतत चालते.
एका अॅप्रनची किंमत केवळ बाराशे ते पंधराशे रूपये आहे. विकसित केलेल्या सिस्टीम किटचे वजन केवळ ७५ ग्राम एवढं आहे. त्यामुळे ही अॅटी रेप सेफ्टी सिस्टम मुली,महिलांना परिधान करताना अजिबात अडचण येत नाहीय. अजय विश्वकर्मा हे संशोधक वृत्तीचे असून सोळा वर्षांपासून एकूण विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित 15 प्रकल्पावर ते काम करत आहेत. त्यांच्या सर्व प्रकल्पांपैकी हा सर्वात मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
अॅटी रेप सिस्टीम म्हणजे काय?
सुष्मीता अडगीलवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुली,महिला रात्री उशिरा कार्यालयातून घरी जातात त्यांची काळजी घेण्यासाठी ही डिझाईन करण्यात आली आहे. महिलांना (Women) हे अॅप्रन परिधान केल्यानंतर सुरक्षित वाटेल हे एक इन्सुलेटेड अॅप्रेन आहे. त्यातही प्रणाली स्थापित केली जाईल.
कोणत्याही चुकीच्या कृतीच्या संबंधात जेव्हा एखाद्या व्यभिचारी एखाद्या महिलेला स्पर्श करेल तेव्हा त्याला सिस्टममधून विघुत प्रवाहाचा हाय फ्रिक्वेन्सी करंट बसेल.तो त्वरीत महिलेच्या दूर होईल. तिला पुन्हा स्पर्श करण्याची हिंम्मत करणार नाही. प्रणालीची सर्व पॅरामीटर्सवर चाचणी केली गेली आहे. जॅकेटची किंमत अगदी गरीब महिलांच्या बजेटनुसार राहणार आहे. डीआरडीओ किंवा सरकारी एजन्सीने अशा महत्त्वाच्या प्रकल्पाला प्रमाणित करून काम सुरू केल्यास महिलांवर होणारे अत्याचारांच्या घटना थांबविता येईल एवढे मात्र नक्की.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.