Sangli News: मांत्रिकाच्या मारहाणीत शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप; 'अंनिस'ची कारवाईची मागणी, सांगलीतील घटना

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील १४ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे.
sangli crime news
sangli crime newsSaam Tv

sangli Crime News: सांगली जिल्ह्यातून धक्कादायक घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील १४ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाचा मृत्यू हा कर्नाटकातील एका मांत्रिकाच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मांत्रिकाच्या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला सांगलीतील मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. आर्यन दिपक लांडगे असे मृत्यू झालेल्या १४ वर्षीय मुलाचे नाव आहे.

sangli crime news
Pimpri Chinchwad Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये युवकाची गोळ्या झाडून हत्या, परिसरात तणावाचं वातावरण

या घटनेचे गांभीर्य ओळखून कवठेमहांकाळ मध्ये अंनिसचे कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावांतील त्या कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेतली. त्यांना आधार देऊन मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यास कुटुंबाची मानसिक तयारी केली.

नेमकं काय घडलं?

आर्यनला सतत ताप येत होता. तो लवकर बरा होत नव्हता. त्यामुळे आर्यनच्या नातेवाईक महिलेने तिच्या मांत्रिक वडीलांकडे आर्यनला कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर या गावातील आप्पासाहेब कांबळे या मांत्रिकाकडे उपचारासाठी त्याला नेले होते.

मांत्रिकाने सांगितले की, मुलाला बाहेरची बाधा झाली आहे. त्यांच्या अंगात भूत शिरलं आहे, ते बाहेर निघत नाही.. म्हणून त्या मुलाची भूतबाधा बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाने त्या मुलाला अमानुषपणे मारहाण केली. यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्या मुलाचा मृत्यू झाला . मांत्रिकाच्या अमानूष मारहाणीमुळे आर्यनचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आहे. त्यामुळे या मांत्रिकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्याकडे केली. त्यांनी तात्काळ मुलांच्या आईला पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन तिची फिर्याद दाखल करुन घेतली.

sangli crime news
Jalgaon Crime News: भयंकर! मुलांना मारुन टाकण्याची धमकी देत विवाहितेचा घरात घुसून विनयभंग

सदर गुन्हा कुडची पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असलेने हा गुन्हा कुडची पोलीस स्टेशनला वर्ग करणार असल्याचे कवठेमहांकाळ पोलिस निरीक्षकानी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com