
Anurag Thakur On Brijbhushan Singh: ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी तपास पूर्णपणे नि:पक्षपातीपणे होईल, चार्जशीट दाखल होईल आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
अनुराग ठाकूर म्हणाले, २०१४ च्या आधी खेळांसाठी जितकं बजेट होतं, त्याच्या तिप्पट बजेट आता केलं आहे. खेळाडूंसाठी अनेक चांगल्या सुविधा मोदी सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत. खेळाडूंनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यावर सगळ्यात आधी आमच्या सरकारने पावलं उचलली.
मी वैयक्तिक जाऊन त्यांना भेटलो, कमिटी स्थापन केली, कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर सबकमिटी तयार केली, पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास केला. सुप्रीम कोर्टातही प्रकरण गेलं आहे. देशातला कायदा आपलं काम करतोय. तपास पूर्णपणे नि:पक्षपातीपणे होईल. चार्जशीट दाखल होईल आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल असेही ते म्हणाले.
रेल्वे अपघातावर कुणीही राजकारण करू नये
रेल्वे अपघात ही दुःखद घटना असून यावर कुणीही राजकारण करू नये असे मत ठाकूर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. ममता बॅनर्जी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्या, त्यांच्या मनात ममता अजिबात नाही. ज्यांच्या राज्यात महिलांवर बलात्कार होतात, लोकांवर बॉम्ब फेकतात. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या, केंद्रात मंत्री होत्या, त्यांना इतकं तरी माहीत हवं की ही आकडेवारी राज्य सरकार देतं, केंद्र सरकार देत नाही. त्या राज्यात भाजपचं सरकार नाही. या प्रसंगातही विरोधी पक्ष राजकारणच करणार आहे का? विरोधी पक्षांकडे राजकारण करण्यासाठी इतर मुद्दे उरले नाहीत का? असा सवालही त्यांनी केला. (Breaking News)
ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांनी मदतकार्य सुरू केलं प्रधानमंत्री स्वतः तिथे गेले. आम्ही कोणत्याही राज्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही, अशा प्रसंगात सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं. यांनी तर कोरोना लसीवरही प्रश्न उपस्थित करत भारतीय लसी घेऊ नका असं सांगितलं. ही कोणती विचारसरणी आहे? नेहमी विष कालवण्याचं, भ्रम, भीती निर्माण करण्याचं काम करणार का? ही वेळ राजकारण करण्याची नाही, तर ज्यांनी आपले नातेवाईक गमावले आहेत, जे जखमी झाले आहेत, त्यांच्यासोबत उभं राहण्याची आहे असे अनुराग ठाकूर म्हणाले. (Latest Political News)
लोकसभेला शिवसेनेच्या जागा त्यांनाच मिळणार?
लोकसभेला शिवसेनेच्या जागा त्यांनाच मिळणार का? असा प्रश्न विचारला असताना त्यावर उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले, हे तुम्ही किंवा मी ठरवू शकत नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. ती वेळ २०२४ मध्ये येईल. आत्ता ती वेळ नाही. जर आम्ही सगळी कामं आणि विकास एकत्र करत आहोत, तर हा निर्णय सुद्धा एकत्र बसून घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
जितेंद्र आव्हाड यांना टोला
यावेळी अनुराग ठाकूर यांनी जितेंद्र आव्हाड यांना देखील टोला लगावला. दुसऱ्यांचा अपमान करण्याची काही लोकांना सवय असते. सिंधी समाजाबद्दल जे शब्द उच्चारले गेले, त्याला कोणताही समाज स्वीकार करणार नाही. त्यांचा निषेध केला पाहिजे. त्यांनी लवकरात लवकर संपूर्ण समाजाची माफी मागितली पाहिजे. ते लवकरात लवकर माफी मागतील असं मला वाटतं असे ते म्हणाले. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.