परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय उभारण्यास मंजुरी; अशोक चव्हाणांनी मानले आभार...

Ashok Chavan: मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयानुसार परभणी येथे पुढील ४ वर्षात ६८२ कोटी रूपये खर्च करून १०० प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व ४०३ खाटांचे संलग्नित रुग्णालय उभारले जाईल.
Approval for setting up of Government Medical College and Hospital at Parbhani; Ashok Chavan thanked to cm uddhav thackeray
Approval for setting up of Government Medical College and Hospital at Parbhani; Ashok Chavan thanked to cm uddhav thackeraySaam Tv

परभणी: परभणीकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. (Approval for setting up of Government Medical College and Hospital at Parbhani; Ashok Chavan thanked to cm uddhav thackeray)

हे देखील पहा -

मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने परभणी (Parbhani) येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय उभारण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे परभणीकरांची जुनी मागणी पूर्ण झाली असून, काँग्रेसचा परभणी जिल्ह्याचा संपर्क मंत्री या नात्याने मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मंत्रिमंडळाचा आभारी आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयानुसार परभणी येथे पुढील ४ वर्षात ६८२ कोटी रूपये खर्च करून १०० प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व ४०३ खाटांचे संलग्नित रुग्णालय उभारले जाईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण तर नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, असं ट्विट करत त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळाचे आभार मानले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com