Aurangabad News: औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया, पाहा Video

Aurangabad Latest News : मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले. त्यासाठी किमान ३० तास लागणार असून, नागरिकांना किमान दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा होईल.
Aurangabad Pipeline Broke
Aurangabad Pipeline Brokeमाधव सावरगावे

Aurangabad Latest News: औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा फुटली आहे. त्यामुळे जुन्या शहराला दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. औरंगाबाद (Aurangabad) जुन्या शहराची तहान भागविणारी ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (Pipeline) शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास फुटली. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या जीव्हीपीव्हीआर कंपनीच्या कामामुळे जलवाहिनी फुटल्याचे समोर आले आहे. (Aurangabad Pipeline Broke)

Aurangabad Pipeline Broke
Video: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांचा पाऊस; पैशांच्या उधळणीचा व्हिडिओ व्हायरल

मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले. त्यासाठी किमान ३० तास लागणार असून, नागरिकांना किमान दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा होईल. जुन्या शहरासाठी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी, तर नवीन सिडको शहरासाठी १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी आहे. दोन्ही पाणीपुरवठा योजना जीर्ण झाल्या असून, किंचित धक्का लागला तरी जलवाहिनी फुटते. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो.

पाहा व्हिडिओ -

Aurangabad Pipeline Broke
Video: वाशीमधील नाल्यात दुर्गंधीयुक्त गुलाबी, लाल रंगाचं पाणी; प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मागील दीड महिन्यात तब्बल पाच वेळा जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. आता पैठण रोडवरील कवडगाव येथे ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी अचानक फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर व शेतात वाहू लागले आणि वाया गेले.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com