Maharashtra Investment News : ८० हजार कोटींची गुंतवणूक अन् हजारो रोजगार, महाराष्ट्रात 'ही' मोठी कंपनी उभारणार प्रकल्प

८० हजार कोटींची गुंतवणूक अन् हजारो रोजगार, महाराष्ट्रात 'ही' मोठी कंपनी उभारणार प्रकल्प
Arcelormittal Nippon Steel Invest in Maharashtra
Arcelormittal Nippon Steel Invest in MaharashtraSaam Tv

Arcelormittal Nippon Steel Invest in Maharashtra : अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लिमिटेड कंपनी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीची महाराष्ट्रात आधीच हजारो कोटींची गुंतवणूक आहे.

Arcelormittal Nippon Steel Invest in Maharashtra
Supriya Sule On Kharghar Heat Stroke : खारघरच्या घटनेला जबाबदार कोण? सरकार उत्तर का देत नाही : सुप्रिया सुळे

स्टील निर्मिती आणि प्रक्रिया पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनी आणखी 80 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे.  (Latest Marathi News)

याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली.

महाराष्ट्रात स्टील उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची कंपनीने ईच्छा व्यक्त केली. यासाठी पाच हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली. शिवाय बीकेसी बांद्रा येथे कंपनीच्या कॉर्पोरेट मुख्यालयासाठी जागा देण्याची विनंती केली.

Arcelormittal Nippon Steel Invest in Maharashtra
Shweta Tiwari : श्वेता ४२ वर्षांचीय? PHOTO पाहून विश्वास बसणार नाही

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्वत: मान्यता दिली.

याबाबत जागा निश्चिती, उर्वरित जमीन आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी मेरिटाईम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधींनी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घ्यावा. कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यातील हजारो तरूणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com