Saam Impact : वाद मिटवू; प्रवीणच्या कुटुंबियांच्या पाठीशी नेते मंडळी

Olympian Pravin Jadhav
Olympian Pravin Jadhav

सातारा : कुणावरही गाव साेडण्याची वेळ येणार नाही. आम्ही स्वतः जातीने या प्रश्नांत घालत आहाेत. गाव पातळीवरच वाद साेडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रवीणने स्वतःच्या खेळावर, करिअरवर लक्ष केंद्रीत करावे. त्याच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही आहाेत असे आश्वासन जिल्ह्यातील नेत्यांनी ऑलिम्पियन प्रवीण जाधव Olympian Pravin Jadhav याच्या कुटुंबास मिळालेल्या धमक्यानंतर 'साम टीव्ही'शी बाेलताना दिले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले कसब दाखवणाऱ्या भारतीय तिरंदाज प्रवीण जाधव यांच्या कुटुंबाला धमक्या दिल्याची घटना नुकतीच समाेर आली आहे. जाधव यांच्या कुटुंबाला त्यांच्या घराची दुरुस्ती करु नये असे शेजारी धमकी देत असल्याचा आरोप प्रवीण याचे वडील रमेश यांनी केला आहे. प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी सरडे गाव साेडून जाण्याची भावना व्यक्त केली आहे.

या घटनेचे पडसाद सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासह राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. ही बाब दुर्देवी असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. प्रवीण जाधव याच्या कुटुंबियांना कायदेशिररित्या संरक्षण दिले जाईल असे पाेलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी नमूद केले आहे.

Olympian Pravin Jadhav
संघर्ष सुरुच; ऑलिम्पियन प्रवीण जाधवच्या कुटुंबास धमक्या

आज (बुधवार) विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर ramraje naik nimbalkar यांनीही जाधव कुटुंबियांवर गाव साेडण्याची अजिबात येणार नाही, आलेली नाही असे साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले. रामराजे म्हणाले त्यांची भावकीतील भांडणे हाेती. काही घरांची भांडणे हाेती. ती गाव पातळीवर साेडविण्याची सूचना मी केली हाेती. सरडे गाव हे शांत आहे. माझे स्वतःचे आवडते गाव आहे. पुढं काही हाेण्यापुर्वीच सर्व शांत केले जाईल.

प्रवीणने खेळावर लक्ष देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याने करिअर करावे. त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या कुटुंबियांशी काेणाचे तरी वाद झाले असतील परंतु त्याच्या कुटुंबियांना गाव साेडण्याची वेळ येईल असे हाेणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करुन रामराजेंनी तात्काळ प्रश्न साेडविण्यासाठी पावलं उचलली जातील असे आश्वासन दिले.

आमदार शशिकांत शिंदे shashikant shinde यांनी देखील प्रवीण जाधव याच्या कुटुंबियांचा प्रश्न साेडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन साम टीव्हीशी बाेलताना दिले. ते म्हणाले मी स्वतः पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करीन. प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत ज्याने कष्ट केले आहेत ज्याने जिल्ह्याचे, देशाचे नाव लाैकिकासाठी प्रयत्न केले त्याच्यावर अशी वेळ आली असेल तर प्रशासनाशी बाेलून वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल. पालकमंत्री यांच्याशी चर्चा करुन याेग्य ताेडगा काढला जाईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com