Arjun Khotklar : दानवेंना म्हटलं, यावेळी मला लोकसभा लढू द्या; खोतकर काय म्हणाले? वाचा...

खोतकरांसाठी आता रावसाहेब दानवे लोकसभेची जागा रिकामी करणार का? अशी चर्चा जालन्यात सुरू झाली आहे.
Raosaheb Danve vs Arjun Khotkar
Raosaheb Danve vs Arjun KhotkarSaam Tv

जालना : शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी आज शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. जालन्यात पत्रकार परिषद घेऊन आपण शिंदे गटाला (Eknath Shinde) पाठिंबा देणार असल्याची घोषणा खोतकर यांनी केली. यावेळी खोतकर प्रचंड भावूक झाले होते. दरम्यान, शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न माध्यमांनी खोतकरांना विचारला यावर त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली. (Arjun Khotkar Latest News)

Raosaheb Danve vs Arjun Khotkar
Arjun Khotklar : अखेर अर्जुन खोतकरांचा शिंदे गटात प्रवेश; भावूक होत म्हणाले, उद्धव ठाकरेंसोबत...

काय म्हणाले अर्जुन खोतकर?

'मी रावसाहेब दानवे यांना म्हटलं की, खूप वर्ष झाले तुम्ही लोकसभा निवडणूक लढवत आहात यावेळी मला लढू द्या' दानवेंना म्हटलं, यावेळी मला लोकसभा लढू द्या’ असं म्हणत खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा माध्यमांसमोर बोलावून दाखवली. त्यामुळे राजकीय वैर संपवून एकत्र आलेल्या खोतकरांसाठी आता रावसाहेब दानवे लोकसभेची जागा रिकामी करणार का? अशी चर्चा जालन्यात सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र असं असलं तरी, आपण शिवसेनेतच असल्याचा दावा खोतकर यांनी केला होता. मात्र, आज जालन्यात पत्रकार परिषद घेऊन खोतकर यांनी आपण शिंदे गटाला समर्थन देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. (Arjun Khotkar Raosaheb Danve Latest News)

Raosaheb Danve vs Arjun Khotkar
Eknath Shinde | CM शिंदे यांचं आनंद दिघे यांच्यावर मोठं विधान; ' त्यांच्यासोबत काय झाले, त्याचे...'

ईडीची कारवाई टाळण्यासाठी ही दिलजमाई झाल्याचा आरोप शिवसेनेतून करण्यात येत होता. तर अडचणीत माणूस सहारा शोधत असतो, अशी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि उद्याचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचे खोतकर यांनी सांगितले.

जालन्यातील जनतेचे मानले आभार

'मी 1990 मध्ये शिवसेनेच्यावतीने पहिल्यांदा आमदार झालो आणि आजपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे, पक्षाची सेवा करत आलो आहे. यामध्ये मी एकटाच नाही तर आमचे सर्व सहकारी आणि सगळ्यांनी मिळून जिल्ह्यात शिवसेनचं संघटन वाढवलं आणि ते सामान्य माणासापर्यंत आम्ही ते घेऊन गेलो. सामान्य माणसाने देखील तेवढाच विश्वास आमच्यावर टाकला. अनेक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आमच्या पदरात लोकांनी यश टाकलं त्याबद्दल मी जालना जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो'. असं म्हणत खोतकर यांनी जालन्यातील जनतेचे आभार मानले.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com