सावधान! अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला

सावधान! अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला
arjuna dam wall

रत्नागिरी : गेले आठवडाभर कोकणात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. राजापूर तालुक्यातील अर्जुना धरणाचा arjuna dam wall उजवा कालवा फुटला आहे. धो धो कोसळणाऱ्या कालवा तुडूंब भरला आणि तो फुटून वाहू लागला. मुख्य बाब म्हणजे सहाच महिन्यापूर्वी या कालव्याचं काम करण्यात आलं होतं. (arjuna-dam-ratnagiri-rain-news-sml80)

दरम्यान याबाबत प्रशासनानं तातडीनं लक्ष घालण्याची मागणी सध्या नागरिकांमधून होत आहे. पावसाचा जोर वाढल्यास इथले नागरिक आणि गुरं, जनावरांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे.

काेकणात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या आठवड्यात राजापूरची बाजारपेठ पाण्याखाली गेली हाेती. पावसाचा जाेर कायम असल्याने प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन केले हाेते.

arjuna dam wall
पावसाचा काेकण रेल्वेला फटका; 'या' गाड्या झाल्या रद्द

पावसामुळे नद्या, नाले तुडूंब भरुन वाहू लागलेत. त्यातच अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटल्याने परिसरातील नागरिकांना चिंता लागली आहे. पाण्याचा प्रवाह वाढला तर जनावरांना धाेका पाेहचू शकताे अशी शक्यता वर्तवली गेली. प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांची आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com