श्रीपाद छिंदमवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून अटक करा - सचिन खरात

अहमदनगरच्या एका पान टपरीवाल्याला जातीवाचक शिव्या दिल्यामुळे छिंदमवर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीपाद छिंदमवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून अटक करा - सचिन खरात
श्रीपाद छिंदमवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून अटक करा - सचिन खरातSaam Tv News

अहमदनगर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल chhatrapati shivaji maharaj आक्षेपार्ह वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम shripad chhindam ahamadnagar पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अहमदनगरच्या एका पान टपरीवाल्याला जातीवाचक शिव्या Caste swear word दिल्यामुळे छिंदमवर अहमदनगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये tofkhana police station अ‍ॅट्रॉसिटीसह atrocity विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यासह आणखीन 4 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी छिंदमवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करुन त्याला अटक करावी अशी मागणी आरपीआयच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.तसेच छिंदम हा वेळोवेळी दोन समाजात भांडणे होईल, अशी वक्तव्ये करतो. आता तर त्याने अहमदनगरच्या टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केली, त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत त्याला अटक करावी अशी मागणी मी मुख्यमंत्री, उप - मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे करतो, असंही खरात म्हणाले. Arrest Shripad Chhindam under National Security Act demand by Sachin Kharat

हे देखील पहा -

कोण आहे श्रीपाद छिंदम?

फेब्रुवारी २०१८ मध्ये फोनवरील संभाषणादरम्यान शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर छिंदम चर्चेत आला होता. या प्रकरणात त्याला त्याचं पद गमवावं लागलं होतं. तसंच त्याला भाजपानेही पक्षाबाहेर हाकललं होतं. हे सगळं होऊनही डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या अहमदगनर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये छिंदम अपक्ष म्हणून लढला, आणि विशेष म्हणजे छिंदम प्रभाग क्रमांक ९ मधून एक हजार ९७० मतांनी अपक्ष म्हणून निवडूनही आला होता. आता या नव्या प्रकरणामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com