रायगड जिल्ह्यात साखर चौथीच्या गणपतीचे आगमन

कोरोनाचे सावट असल्याने नियमांचे पालन करून साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जात आहे. जिल्ह्यात खाजगी 256 तर सार्वजनिक 54 गणरायाची स्थापना करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात साखर चौथीच्या गणपतीचे आगमन
रायगड जिल्ह्यात साखर चौथीच्या गणपतीचे आगमनराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर,रायगड

रायगड: गणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला (दि. 20 सप्टेंबर) झाली. शुक्रवारी आज (दि 24 सप्टेंबर) रायगड जिल्ह्यात साखर चौथीच्या म्हणजेच गौरा गणपतींचे आगमन झाले. दीड दिवसांच्या मुक्कामानंतर शनिवारी (दि.25 सप्टेंबर ) या गणपतीना निरोप दिला जाईल. कोरोनाचे सावट असल्याने नियमांचे पालन करून साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जात आहे. जिल्ह्यात खाजगी 256 तर सार्वजनिक 54 गणरायाची स्थापना करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात हा साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सवात अनंत चतुर्दशीनंतर येणार्‍या पहिल्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. याला गौरा गणपती असेही म्हटले जाते. रायगड जिल्ह्यात पेण, पनवेल, उरण, कर्जत, अलिबाग या तालुक्यांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 

रायगड जिल्ह्यात साखर चौथीच्या गणपतीचे आगमन
डिसीसी बँकेच्या सिरसदेवी शाखेच्या विरोधात शिवसेनेचे बेमुदत उपोषण

पेण तालुक्यात मोठ्या संख्येने गणेश कार्यशाळा आहेत. तेथे गणेश चतुर्थीच्या दिवसापर्यंत काम चालत असते. त्यामुळे या कारागीरांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही म्हणून साखरचौथीच्या गणेशोत्सवाला सुरवात झाल्याचे काहीजण सांगतात. काहीच्या मते कोकणात घरगुती गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र येथील भक्तांना सार्वजनिक गणेशोत्सवाचा आनंद लुटता येत नाही. ही संधी सर्वांना मिळावी या हेतूने या उत्सवाची सुरूवात झाली असे सांगितले जाते. रायगड जिल्ह्यात साखरचौथ गणेशोत्सव उत्सव साजरा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com