Palghar : कलेतून विठ्ठलालाच आणलं घरी; कलेच्या शिक्षकाची अशीही विठ्ठलभक्ती

Ashadi Ekadashi 2022 : कौशिक जाधव या चित्रकाराने आषाढी एकादशीच्या निम्मिताने कडधान्यांचा उपयोग करुन विठ्ठलाची अतिशय सुंदर अशी कलाकृती साकारली आहे.
art teacher Kaushik Jadhav made beautiful art of vitthal using Cereal in palghar
art teacher Kaushik Jadhav made beautiful art of vitthal using Cereal in palgharरुपेश पाटील

पालघर: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Ekadashi) पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी मोठ्या प्रमाणात जमले आहेत. आपल्या लाडक्या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण आतूर आहेत. मात्र जे भक्त विठुमाऊलीच्या दर्शनाला जाऊ शकले नाही त्यांनी आपापल्या घरातूनच विठ्ठलाची आरास केली आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातल्या भाताणे येथील कौशिक दिलीप जाधव या चित्रकाराने आषाढी एकादशीच्या निम्मिताने कडधान्यांचा उपयोग करुन विठ्ठलाची अतिशय सुंदर अशी कलाकृती साकारली आहे. ही कलाकृती त्यांनी अवघ्या 20 मिनिटांच्या कालावधीत पूर्ण केली आहे. (Ashadi Ekadashi Palghar News)

हे देखील वाचा -

art teacher Kaushik Jadhav made beautiful art of vitthal using Cereal in palghar
शिंदेंच्या ४ पिढ्यांनी केली पांडूरंगाची पूजा; संभाजी ते रुद्रांश शिंदेंकडून शासकीय महापूजा

चित्रकार असलेले कौशिक जाधव यांनी तूरडाळ, मसूरडाळ, मुगडाळ, चवळी, वाटाने, चणे आणि अन्य कडधान्यांचा वापर या कलाकृतीमध्ये केला आहे. देव चराचरामध्ये आहे, हे दाखवण्यासाठी कौशिक जाधव यांच्या कलाकृतीमधून हा संदेश देण्यात आला आहे. तसेच चित्रकार कौशिक जाधव यांनी या अगोदर तांत्रिक उपकरणातून आणि पेन, पट्टी, पेन्सिल याचा वापर करत ही विठूमाऊली साकारली होती. तसेच पानाफुलांतून अश्या अन्य 12 वेगवेगळ्या प्रकारे विठुमाऊलीच्या कलाकृती त्यांनी साकारल्या आहेत. कौशिक जाधव हे वसईतील डॉ. एम. जी. परुळेकर आणि न्यू इग्लिश स्कूल या शाळेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपली ही सर्व कला ते मुलांना शिकवत आहेत. विठ्ठल्लाच्या दर्शनासाठी त्यांना पंढपूरला जाता आलं नाही, पण त्यांनी आपल्या कलेतून साक्षात विठ्ठलालाच आपल्या घरी आणलं आहे. (Palghar Latest News)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com