'होय... मी गांजा ओढत होतो'; आर्यन खानची एनसीबी समोर कबुली

आर्यनने एनसीबीला असेही सांगितले की, तो वांद्रे येथील एका डीलरला ओळखतो
Aryan Khan Latest News in Marathi, Aryan Khan case news updates
Aryan Khan Latest News in Marathi, Aryan Khan case news updatesSaam TV

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळालेला बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याने एनसीबीसमोर (NCB) गांजा सेवन केल्याची कबुली दिली. आर्यनने एनसीबीला म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सांगितले की, झोप न येण्याचा त्रास होत असल्याने मी गांजा (Ganja) घेण्यास सुरूवात केली होती. कोर्डेलिया क्रुझ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २० पैकी १४ जणांविरुद्ध एनसीबीने शुक्रवारी मुंबई न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात आर्यन खान गांजा ओढत असल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. (Aryan Khan Latest News)

Aryan Khan Latest News in Marathi, Aryan Khan case news updates
रेल्वेखाली उडी घेत माय-लेकीची आत्महत्या; धक्कादायक घटनेने नाशिक हादरले

एनसीबीने शुक्रवारी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये आर्यनसह अन्य पाच आरोपींचे नाव वगळण्यात आले आहे. पण याप्रकरणी एनसीबीच्या चौकशीत त्याने दिलेला जबाब आरोपपत्रात नमूद आहे. 'अमेरिकेत पदवीचे शिक्षण घेत असताना झोप न येण्याचा त्रास होता. त्यावर मात करण्यासाठी २०१८ मध्ये गांजा घेण्यास सुरुवात केली होती. गांजा घेतल्याने या समस्येवर मात करता येते, असे इंटरनेटवर वाचले होते. त्यामुळेच गांजा घेत होतो. तसेच लॉस एंजेलिसला असताना एकदा आनंद म्हणून मारिजुआना या अमली पदार्थांचे सेवन केले होते', असे आर्यनने या जबाबात मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्यनने एनसीबीला असेही सांगितले की, तो वांद्रे येथील एका डीलरला ओळखतो, परंतु त्याला त्याचे नाव किंवा नेमके ठिकाण माहित नाही कारण मुख्यतः तो (डीलर) त्याच्या मित्राला ओळखतो, ज्याला या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे. एनसीबीने क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. आर्यनकडे कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नसल्याने तसेच तो ड्रग्ज प्रकरणात सहभागी होता, हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्याला या प्रकरणातून क्लिन चीट देण्यात आली आहे.

दरम्यान, आर्यन खानला या प्रकरणातून सोडण्यासाठी अभिनेता शाहरुख खानकडे खंडणी मागितली किंवा खंडणी उकळण्याचे नियोजन करण्यात आले होते, अशी कुठलीही शक्यता या प्रकरणातील दक्षता समितीला आढळली नाही. आर्यनच्या अटकेनंतर रंगलेल्या नाट्यात प्रकरणातील साक्षादार प्रभाकर सैल यांनी तपास पथकप्रमुख समीर वानखेडे यांचा 25 कोटी रुपये उकळण्याचा डाव होता, असा आरोप करण्यात आला होता.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com