विठ्ठलभक्त चिमुकल्याने केसात साकारली माऊलींची छबी
विठ्ठल भक्त चिमुकल्याने केसात साकारली माऊलींची छबी राजेश भोस्तेकर

विठ्ठलभक्त चिमुकल्याने केसात साकारली माऊलींची छबी

अलिबागच्या सुशील भोसले याची किमया

अलिबाग: 'युगे अठ्ठावीस, उभे विटेवरी असा पांडुरंग हा आजही आपल्या भक्ताच्या हाकेला ओ देण्यासाठी पंढरपुरात विटेवरी उभा आहे. कोरोनाच्या (Coronavirus) या महमारीत यावर्षीही आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) विठ्ठल भक्तांना आपल्या विठुरायचे दर्शन घेण्याचा योग हुकला आहे. असे असले तरी अलिबाग तालुक्यातील मांडवा येथील नऊ वर्षाचा आश्लेष सुभाष पाटील या विठ्ठल भक्ताने आपल्या केसात माऊलींची छबी कोरून विठ्ठलावरील आपली निस्सीम भक्ती प्रगट केली आहे. सारळ गावातील सुशील भोसले यांनी ही छबी आश्लेषच्या केसात कोरली आहे.

अलिबाग तालुक्यातील मांडवा येथील आश्लेष पाटील हा विठ्ठलाचा भक्त आहे. आश्लेष याने आपल्या वडिलांकडे केसात माऊलीची छबी कोरण्यासाठी हट्ट धरला. सारळ गावातील सुशील भोसले यांचे केश कर्तनालय असून विविध छबी केसात कोरण्याची कला त्याच्या हातात आहे.

सुशील भोसले यांनी राजकीय नेते, देव देवता, सिने कलाकार याच्या छबी  हौशी ग्राहकाच्या केसात कोरल्या आहेत. आश्लेष याच्या वडीलांनी त्याला सुशील याच्याकडे नेले आणि केसात विठ्ठलाची छबी कोरण्याबाबत सांगितले. सुशील भोसले यांनीही आश्लेष च्या केसात माऊलीची छबी कोरण्याची तयारी दर्शवली. अलिबाग तालुक्यात आज मुसळधार पाऊस त्यातच अनेक भागात पाणी साचले असताना आश्लेष हा सलून दुकानात आला. सुशील यानेही आश्लेष याचा हा बाल हट्ट पुरविला असून सुंदर, सुबक अशी कंबरेवर उभा असलेल्या पांडुरंगाची छबी कोरली आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com