यंदाचा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान सोहळा 'या' तारखेला असणार?

आषाढी वारीची (Ashadhi Wari) घोषणा आज करण्यात आली
यंदाचा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान सोहळा 'या' तारखेला असणार?
Ashadhi WariSaamTv

पुणे : संपूर्ण वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून होता, त्या आषाढी वारीची (Ashadhi Wari) घोषणा आज करण्यात आली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी २० जूनला पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. देहू (Dehu) संस्थांनने या सोहळ्याची आज घोषणा करण्यात आली आहे. यामुळे वारकाऱ्यांमध्ये (Warkaris) अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पालखी सोहळ्या एकूण ३२९ दिंड्या सहभागी होत असतात. यंदा ही पालखी पुणे (Pune) आणि इंदापूरमध्ये (Indapur) २ दिवसांच्या मुक्कामी असणार आहे.

हे देखील पाहा-

पायी प्रवास पूर्ण करून पालखी ९ जुलैला पंढरपूरमध्ये (Pandharpur) पोहोचणार आहे. तर १० जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी (Alandi) या ठिकाणाहून २१ जूनला प्रस्थान करण्यात येणार आहे. गेल्या २ वर्षे कोरोनामुळे पायी वारी बंद करण्यात आली होती. आता आषाढी वारीची घोषणा झाल्याने वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. शेकडो वर्षांपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अखंडितपणे पार पडत आहे. या पालखी सोहळ्याची घोषणा आज करण्यात आली आहे.

Ashadhi Wari
'आसानी' चक्रीवादळामुळे 'या राज्यात' मुसळधार पाऊस

यंदा हा पालखी सोहळा देहूतून २० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. कोरोना संसर्ग ओसरल्याने सध्या सर्व निर्बंध शिथिल करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याने वारकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. पालखी प्रस्थानाची तारीख जाहीर झाल्याने वारकरी वारीच्या तयारीला आता लागणार आहेत. कोरोनाने गेल्या २ वर्षे वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. त्यांच्या पायी वारीमध्ये खंड पडला होता.

मात्र, परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. २ वर्षाचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी मोठ्या प्रमाणात उत्सुक झाले आहेत. गावागावात वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता या सर्वांना संत तुकोबा आणि संत ज्ञानोबांच्या पालखी प्रस्थानाची आणि पायी विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.