मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते झाली .
Eknath Shinde
Eknath Shinde saam tv

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. पूजा करताना मंदिराचा गाभारा विठुमाउलीच्या जयघोषात दुमदुमून गेला. यंदा मानाचे वारकरी म्हणून नवले दाम्पत्यांना मान मिळाला. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली. ( Ashadhi Ekadashi 2022 News In Marathi)

या वर्षी कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्याने राज्य सरकारने वारीला परवानगी दिली होती. त्यामुळे यंदा वारकऱ्यांमध्ये उत्साह दुणावला होता. यावर्षी विदेशातील वारकरी देखील पंढरीला आले आहेत. आषाढीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा झाली आहे. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, स्वत: एकनाथ शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि संभाजी शिंदेंचा पणतू अशा चार पिढ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यंदा मानाचा वारकरी म्हणून मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मान मिळाला.

Eknath Shinde
आषाढी एकादशीनंतर होणार शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ? दिल्लीत झाली चर्चा

नवले दाम्पत्य हे बीड जिल्ह्यातील रुई गावचे रहिवासी आहेत. गेल्या मुरली नवले व त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या गेल्या वीस वर्षापासून पायी आषाढी वारी करतात. हे दाम्पत्य संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा सोबत पंढरपूरला पायी आले आहेत. यंदा मंदिर प्रशासनाने आषाढी एकादशीसाठी जय्यत तयारी केली आहे.

संत ज्ञानेश्वर माऊली, रुक्मिणी पालखी, संत एकनाथ महाराज, संत सोपनकाका, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई आदी या मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com