वरसोली येथील विठ्ठल मंदिरात कोरोना नियम पाळून आषाढी एकादशी उत्सव संपन्न

अलिबाग तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरसोली येथील श्री क्षेत्र विठोबा मंदिरात आज कोरोनाच्या नियमांचे पालन करून आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला.
वरसोली येथील विठ्ठल मंदिरात कोरोना नियम पाळून आषाढी एकादशी उत्सव संपन्न
वरसोली येथील विठ्ठल मंदिरात कोरोना नियम पाळून आषाढी एकादशी उत्सव संपन्नराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

अलिबाग तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरसोली येथील श्री क्षेत्र विठोबा मंदिरात आज साधेपणाने कोरोनाच्या नियमांचे पालन करून आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी अडीच वाजता हर्षल नाईक, सौ निशिंगदा नाईक या दाम्पत्यांनी विठ्ठल रखुमाई याची काकड आरती, अभिषेक यथोचित पूजा केली. सकाळी चार वाजता मुख दर्शनासाठी भाविकांना महाद्वाराजवळून दर्शन खुले करण्यात आले. दरवर्षी आषाढी एकादशीला तालुक्यातील गावामधून दिंड्या येत असत. मात्र कोरोना प्रादुर्भाव असल्याने दिंड्याना परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे भाविकांना आपल्या माऊलीचे दर्शन हे महाद्वारातूनच घ्यावे लागले आहे. Ashadi Ekadashi celebrations in the Vitthal temple at Versoli following the Corona rules

हे देखील पहा -

अलिबाग शहराला लागून असलेल्या वरसोली गावात श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई पुरातन मंदिर आहे. प्रति पंढरपूर म्हणून या मंदिराची ख्याती आहे. आषाढी, कार्तिकी एकादशीला मंदिराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकट असल्याने मंदिरातील विधी ह्या कोरोनाच्या नियमांचे पालन करून केल्या जात आहेत. आषाढी, कार्तिक एकादशीला हजारो भाविक या मंदिरात विठुरायाच्या दर्शनाला येत असतात.

वरसोली येथील विठ्ठल मंदिरात कोरोना नियम पाळून आषाढी एकादशी उत्सव संपन्न
राज कुंद्राला २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी

आज आषाढी एकादशी असल्याने श्री क्षेत्र विठ्ठल मंदिरात कोरोनाच्या नियमांचे पालन करून कमी लोकांच्या उपस्थितीत यथोचित पूजा, अर्चना पार पडली. वरसोलीतील हर्षल नाईक आणि निशिगंदा नाईक या दाम्पत्यांनी विठ्ठल रखुमाईची आरती, अभिषेक केला. कोरोना प्रादुर्भाव असल्याने गाभाऱ्यात जाऊन माऊलीचे दर्शन घेण्यास भाविकांना बंदी असली तरी महाद्वार जवळून दर्शनाची सोय मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. सायंकाळी कीर्तन आणि पाद्यपूजा कार्यक्रमही मंदिराचे विश्वस्त आणि मोजकेच व्यक्तीच्या उपस्थितीत होणार आहेत. त्यामुळे आषाढी एकादशीला भाविकांना दरवाज्यातूनच दर्शनाचा लाभ दिला जात आहे. सकाळपासून भाविकांची पावले माऊलीच्या दर्शनासाठी वळली आहेत.

Edited By - Akshay Basiane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com