आषाढी वारी : इंद्रायणी घाट भक्तांविना सुना सुना

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आळंदी व परिसरात संचारबंदी लागु करण्यात आली आहे.
इंद्रायणी घाट, आळंदी
इंद्रायणी घाट, आळंदी Saam tv

रोहिदास गाडगे

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा (Sant Dnyaneshwar Mauli) आषाढी वारी (Aashadhi Wari) पालखी सोहळा (Palakhi Sohla) अलंकापुरीतुन उद्या प्रस्थान होतोय. शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक प्रणालीनुसार, काही निवडक वारकऱ्यांच्या (Warkari) उपस्थितीत उद्या (ता. २) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) पंढरीकडे (Pandharpur) प्रस्थान होईल. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आळंदी व परिसरात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. पवित्र इंद्रायणी घाट वारक-यांविना सुना सुना पहायला मिळतोय. ऐरवी लाखो वारक-यांच्या विठुमाऊलीच्या नामाने गजबजलेला असतो. मात्र मागील वर्षापासुन आळंदीत आषाढी कार्तिकी सोहळा मर्यादित वारक-यांच्या उपस्थित साजरा होत असल्याने अंलकापुरी वारक-यांविनाच सुनीसुनी झाली आहे. (Ashadi Wari: Indrayani Ghat is empty without devotees.)

इंद्रायणी घाट, आळंदी
आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या भाविकांना कोरोना चाचणी बंधनकारक..

राज्यात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. या काळात लागू केलेल्या लॉकडाऊनचा अनेक क्षेत्रावर परिणाम झाला. धार्मिक क्षेत्रावरही याचा परिणाम झालेला पाहायला मिळाला. राज्यात आषाढी वारीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर मोठ्या संख्येने होणारी वारी रद्द करून पालखी सोहळा काही निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत करण्याला परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनामुळे तीर्थक्षेत्र आळंदीमध्येही संचारबंदी लावण्यात आली आहे. आषाढी वारीनिमित्त आळंदीत मोठ्या संख्येने वारकरी हजेरी लावत असतात. मात्र संचारबंदीमुळे यावर्षी देखील यावर्षीदेखील आळंदी सुनी पडली आहे. कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करता येणार नसल्यामुळे अनेक वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून आळंदीत पासधारकांनाच प्रवेश दिला जात आहे. वारी असूनही आळंदीतिल इंद्रायणी घाट, सिद्धबेट, गोपाळपुरा, महाद्वार आणि मंदिर परिसरात संचारबंदी असल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

घाटावर दिसला चिमुकला वारकरी

वारकरी आणि पोलीसांचे एक वेगळं नातं आषाढीवारी काळात पहायला मिळतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात प्रस्थानाचा उत्साह असला तरी इंद्रायणी घाट मात्र सुना सुना आहे. तुरळक पोलिस आणि काही स्थानिक अशा बोटावर मोजण्या इतक्या व्यक्तींचा वावर घाटावर पाहायला मिळत आहे. याच इंद्रायणी घाटावर एक अनोख दृश्य पाहायला मिळाले. कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याला एक चिमुकला वारकरी दिसला. या महिला कर्मचाऱ्याला त्या घाटावर त्याला मिठीत घेण्याचा मोह आवरता आला नाही. ही दृश्य वारी परंपरेचे अनोखे चित्र दाखवणारे आहे. अशीच भावना पाहणाऱ्याच्या मनात आली पाहणाऱ्याच्या मनात येते.

इंद्रायणी घाट, वारकरी
इंद्रायणी घाट, वारकरीसाम टीव्ही

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com