Politics: राज्यात निर्बंध उठवण्यासाठी सरकारचा "वाटाघाटीचा" नवा धंदा
Politics: राज्यात निर्बंध उठवण्यासाठी सरकारचा "वाटाघाटीचा" नवा धंदाSaam Tv News

Politics: राज्यात निर्बंध उठवण्यासाठी सरकारचा "वाटाघाटीचा" नवा धंदा

ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केला आहे.

मुंबई : ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केला आहे. वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात म्हणून रेस्टॉरंटवाले, बारवाले, भेटले "वाटघाटी" झाल्या. वाटा मिळाला की, निर्बंधात शिथिलता दिली जाते. तर दुसरीकडे घाट्यात असलेले मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोककलावंत, धुप कापूर विकणारे हे घाट्यात आहेत, वाटाघाटी करु शकत नाहीत, वाटा देऊ शकत नाहीत म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरु आहे, हा वाटघाटीचा धंदा बंद करा, आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटघाटी करणार का? असा सवाल करीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी आज ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली.

हे देखील पहा-

राज्यातले थिएटर सुरू करण्यासाठी सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीतला एक राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्यावतीने वाटाघाटी करतो आहे. वाटाघाटी करा मग निर्बंध शिथिल करु असा धंदा सुरू आहे. शिवसेनेच्या राज्यसभा सदस्याच्या जावयाने हे धंदे बंद करा, अन्यथा आम्ही नाव जाहीर करु, असा गर्भित इशारा ही यावेळी आशिष शेलार यांनी दिला आहे.

आशिष शेलार यांनी वांद्रे येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हाणाले की, काल दिवसभर गोविंदाला नोटीस काय, धरपकड काय, बलाचा वापर काय, अटक काय, या सगळ्या गोष्टीचा काय महाराष्ट्रात आणि मुंबईत घडल्या, जणू काही सुलतानी पद्धतीचा कारभार सुरु होता. म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आठवण करून देतो, ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात आम्ही मांडला, करोडोंची वसुली केल्यानंतर ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला, तर तुम्ही म्हणाला होतात की, सचिन वाझे लादेन आहे काय? म्हणून आज आमचा सवाल आहे तुम्हाला, हे गोविंदा काय लादेन आहेत काय? ज्या पद्धतीने बळाचा वापर करून, अटक करून, धरपकड करून, नोटीस देऊन, केसेस टाकताय म्हणून हा सवाल आम्ही तुम्हाला विचारतोय.

Politics: राज्यात निर्बंध उठवण्यासाठी सरकारचा "वाटाघाटीचा" नवा धंदा
माझी नाही, लोकांचीच जिरली! पराभवानंतर राम शिंदेंचे विश्लेषण

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेच्या बाजूने भाजपा आहे, पण निर्बंधांमध्ये वाटाघाटी करून निर्बंधाचा धंदा करण्याच्या सिलेक्टीव्ह कामामध्ये आम्ही बरोबर नाही. आम्ही त्या विरोधात आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, नियम नियमावली करून मंदिर उघडा, प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेऊन, त्याचे नियम करून गणेशोत्सव साजरा करू द्या. हिंदु सणांवर आक्रमण बंद करा. एका विशिष्ट वर्गाची मत मिळायला लागल्यापासून गेल्या तीन-चार वर्षांपासून शिवसेनेने हे काम सुरू केले आहे. याची सुरुवात बेहराम पाड्यापासून झाली आहे. या बेहराम पाड्यात शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला आणि सर्वे मध्ये एका विशिष्ट वर्गाची मते मिळत आहेत असे दिसू लागल्यावर शिवसेनेने एका विशिष्ट वर्गाचे लांगुलचालन सुरु केले आहे. लालबाग, परळ आणि महाराष्ट्रातील जनतेकडे दुर्लक्ष केले आहे. तुम्हाला तुमचे राजकारण लखलाभ सामान्य जनतेसाठी आम्ही आवाज उठवत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com