अशोक चव्हाणांची भेट झाली नाही, म्हणून तरुणीने केली दगडफेक?
Breaking : अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेकSaam Tv

अशोक चव्हाणांची भेट झाली नाही, म्हणून तरुणीने केली दगडफेक?

अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक करणारी तरुणी पोलिसांच्या ताब्यात; तरुणी मनोरुग्ण असल्याचा पोलिसांचा अंदाज...

नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या आनंद निलयम या निवासस्थानावर राडा घालून दगडफेक करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ही तरुणी सकाळी पावणे अकरा च्या सुमारास अशोक चव्हाण यांच्या घराजवळ आजारी आईला विलचेअरवर घेऊन आली आणि अशोक चव्हाण आहेत का मला त्यांना भेटायचे आहे.

म्हणून सुरक्षा रक्षकांना विचारणा केली. सुरक्षा रक्षकांनी साहेब नाहीत म्हटल्यानंतर चिडलेल्या तरुणीने गोंधळ घालत निवासस्थानावर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी घटनास्थळावर धाव घेतली मात्र तोपर्यंत तरुणी आईसह निघून गेली होती. ही तरुणी उच्च शिक्षित असून तिची मानसिक स्थिती चांगली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Breaking : अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक
उल्हासनगरात गाऊनच्या कारखान्यात चोरी; महिलांचे दीड लाखांचे गाऊन घेऊन चोरटे पसार!

दरम्यान, ही तरुणी काबरा नगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. केवळ चव्हाण यांना भेटता आले नाही म्हणून या तरुणीने दगडफेक केल्याचे पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी सांगितले. या प्रकरणी तरुणी विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळ पासून च अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक झाल्याच्या घटनेनं तर्क वितर्क लढविल्या जात होते. मात्र, आता या घटनेला पुर्ण विराम मिळाला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com