राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ. जीवतोडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

चंद्रपुरात राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ. जीवतोडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ. जीवतोडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेशसंजय तुमराम

चंद्रपूर - विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे ashok jivtode यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ncp पक्षात प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.

हे देखील पहा -

या सोहळ्याला प्रांताध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. चंद्रपूर आणि विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे प्रा. डॉ. जीवतोडे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीने भाजपशी जवळीक असलेला एक परिचित मोहरा आपल्यात ओढून घेतल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ. जीवतोडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
चिंताजनक ! भंडारा जिल्ह्यात कोरोना नव्हे तर वाढतोय 'हा'आजार

विदर्भाच्या विविध जिल्ह्यात पसरलेल्या शिक्षण संस्था आणि ओबीसी महासंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर कामाची छाप असलेले डॉ. जीवतोडे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला जिल्ह्यात एक दमदार चेहरा मिळाला आहे.

Edited by- Ashwini jadhav kedari

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com