रानडुकराच्या हल्यात सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू; समाजकल्याण आयुक्तांनी दिली आश्रमशाळेस भेट

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता समाजकल्याण आयुक्तांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
wild boar , student , school , yavatmal
wild boar , student , school , yavatmalsaam tv

- संजय राठोड

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लाखखिंड येथील विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रम शाळेत इयत्ता पहिलीत शिकणा-या एका विद्यार्थ्याचा (student) रानडुकराने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात (village) एकच खळबळ उडाली आहे.

लाखखिंड गावात विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रम शाळेनजीक हा प्रकार घडला. रिंकेश प्रवीण राठोड (वय सात) या विद्यार्थ्यावर रानडुकराने हल्ला केला. रिंकेश हा सकाळी शौचास गेला असताना त्याच्यावर रानडुकराने हल्ला केला. त्यात रिकेंशचा मृत्यू झाला.

रिकेंश या इयत्ता पहिलीत हाेता. त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळं आश्रमशाळा प्रशासना विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता समाजकल्याण आयुक्तांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

Edited By : Siddharth Latkar

wild boar , student , school , yavatmal
Navratri : मनसेची ५० खाेके बक्षीस याेजना; रास दांडियात जिंकल्यास सुरत, गुवाहाटी, गोवा टूर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com