Himanta Biswa Sarma: बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ! आसामच्या मुख्यमंत्र्यांचे CM शिंदेंना पत्र, म्हणाले;...

बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आसाम राज्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते, ज्यावरुन आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे....
Bachchu Kadu News
Bachchu Kadu NewsSaam Tv

Assam CM Letter To CM Eknath Shinde: प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आसाम राज्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. विधानसभेत भटक्या कुत्र्यांबद्दल बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा, तिथे त्यांना किंमत आहे. आसाममधील (Assam) लोक कुत्र्यांचं मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसे तिकडचे लोक श्वानाचं मांस खातात." असं वक्तव्य केलं.

यानंतर आसाममधील सामान्य आसामच्या नागरिकांनी या वक्तव्याविरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच या वक्तव्या विरोधात आसामच्या विधानसभेत देखील गोंधळ पहायला मिळाला. हा वाद आता आणखी वाढला असून आसामचे मुख्यमंत्री हिमांतबिश्वा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहले आहे.

Bachchu Kadu News
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या इशाऱ्याची प्रशासनाकडून गंभीर दखल; माहीमच्या समुद्रातील अनाधिकृत बांधकाम पाडणार

जाहीर माफी मागावी...

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यबाबत हेमंत बिस्वा शर्मा यांनी हे पत्र लिहिलं आहे. बच्चू कडू यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपलं वक्तव्य मागे घ्यावं. दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Bachchu Kadu News
Raigad Accident : कोल्हापूरला दर्शनाला निघाले, पण वाटेतच मृत्युने गाठलं; भीषण अपघातात ३ भाविकांचा जागीच मृत्यू

तसेच यापत्रामध्ये त्यांनी आसामच्या लोकांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अतिव दुःख झाल्याचे सांगत आसामच्या संस्कृतीबद्दल आपले अज्ञान दाखवले आहे. त्यामुळे तुम्ही आसामच्या लोकांच्या भावनांचा आदर ठेवाल, अशी आशा असल्याचेही त्यांनी या पत्रामध्ये म्हणले आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com