आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते पिंपळनेर येथे खावटी कीटचे वाटप
आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते पिंपळनेर येथे खावटी कीटचे वाटपभुषण अहिरे

आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते पिंपळनेर येथे खावटी कीटचे वाटप

आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या हस्ते 25 आदिवासी बांधवांना करण्यात आले आहे.

धुळे: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळेतर्फे पिंपळनेर येथील कै. हरिभाऊ चौरे आश्रमशाळा परिसरात आयोजित खावटी अनुदान योजने अंतर्गत अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या हस्ते 25 आदिवासी बांधवांना करण्यात आले आहे. यावेळी आमदार मंजुळा गावित यादेखील मंत्री पाडवी यांच्यासह या खावटी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित होत्या.

खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये डीबीटीद्वारे वर्ग करण्यात येत असून दुसऱ्या टप्प्यात खावटी किटच्या माध्यमातून मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, तूरडाळ, साखर, शेंगदाणा तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ व चहा अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे असे यावेळी पाडवींनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com