
Beed : बीड (beed latest news) जिल्ह्यातील आष्टीसह परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून टँकरच्या टँकर भेसळयुक्त दूध (Dudh Bhesal) तयार करून ते विकणाऱ्या राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदेचे पितळ नुकतेच उघडे पडले. या प्रकरणातील मास्टर माईंड सतीश शिंदे यांचा अद्याप शाेध पाेलिसांना लागू शकलेला नाही. दरम्यान शिंदे यांनी गंभीर गुन्हा केल्याने त्यांचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय आष्टी वकील संघाने घेतला आहे. (Breaking Marathi News)
बीडच्या आष्टी शहरातील एका गोडाऊन मधून 132 गोण्या पावडर, रसायन आणि पाम तेलाचे 220 डबे नुकतेच छापा टाकत जप्त करण्यात आले होते. जवळपास नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल या प्रकरणात जप्त करण्यात आला आहे.
धोकादायक रासायनिक पदार्थ वापरून दूध भेसळीच्या मोठ्या कारवाईने, बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील उमटले होते. आष्टी पोलिस आणि अन्न औषध विभागाने छापा टाकला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले.
दरम्यान आठवडा उलटूनही या प्रकरणातील मास्टर माइंड राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे (NCP Leader Satish Shinde) हे अद्याप पाेलिसांना सापडू शकलेले नाहीत. त्यांना तात्काळ अटक करावी अशी नागरिकांतून मागणी हाेऊ लागली आहे.
आष्टी वकील संघाने सतीश शिंदे यांचे वकील पत्र घेणार नसल्याची भुमिका जाहीर केली आहे. त्यामुळे शिंदेंना इतर जिल्ह्यातून वकील शोधावा लागणार आहे. सतीश शिंदे हा लहान लेकरांना दूध नाही तर विष पाजत होता. अशा माफियांच्या मुस्क्या आवळून त्यांना कायमचे जेलबंद केले पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.