Mumbai local train
Mumbai local trainSaam TV

Mumbai local train: आसनगाव रेल्वे स्थानकात प्रवाशांचा आक्रोश; रेल्वे रुळावर उतरून रेल रोको आंदोलनाची वेळ का आली?

लोकल उशिरा आल्याने कामावर जाण्यासाठी उशीर होत असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे

Mumbai local train : मुंबईची (Mumbai) लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे नेहमीच उशिराने धावते. याचा त्रास सर्वच प्रवाशांना सहन करावा लागतो. अशात आज आसनगाव रल्वे स्थानकात मोठे आंदोलन करण्यात आले. शेकडो प्रवाशांनी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे समोर रेल रोखो आंदोलन केले. रेल्वे वेळेवर यावी यासाठी हे आंदोलन आज सकाळी करण्यात आले. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या आसनगाव रेल्वे स्थानकात हे रेल रोखो आंदोलन करण्यात आले. कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात शेकडो प्रवाशी देखील सहभागी झाले होते. लोकल उशिरा आल्याने कामावर जाण्यासाठी उशीर होत असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात अनेक वेळा रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र अद्यापही लोकल वेळेवर येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Mumbai local train
Train Travel Tips : IRCTC च्या 'या' टूर पॅकेजसोबत स्वस्तात मस्त सफारी करा परदेशाची !

रेल्वेने प्रवास करत असताना सकाळी कामाच्या वेळेत शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. रेल्वेला येण्यास उशीर झाल्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी उफाळून येते. यामुळे अनेक प्रवाशांना रेल्वेमध्ये चढण्यासाठी देखील मोठी तारेवरची कसरत करावी लागते. यात अनेकांचा अपघात देखील झाला आहे. तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिक सातत्याने रेल्वे वेळेवर सोडण्यात यावी अशी मागणी करतात.

Mumbai local train
Mumbai local train update : ...या रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक!; पाहा सविस्तर बातमी । SAAM TV

मध्य रेल्वेत या समस्या जास्त प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. कर्जत, कसारा अशा ठिकाणी रेल्वेची संख्या कमी आहे. त्यामुळे लोकल सेवा वाढवण्याची मागणी देखील वारंवार होत आहे. रेल्वे सेवा कमी असल्याने प्रवाशांमध्ये दररोज वाद होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. येथे देखील रेल्वेत सीट मिळवण्यावरून दोन प्रवाशांमध्ये चांगलीच जुंपली होती. रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने रेल्वे (Train) संख्या वाढवा तसेच रेल्वे वेळेवर यावी याची मागणी केली जात आहे. मात्र योग्य प्रतिसाद येत नसल्याने आता नागरिकांनी रेल रोको आंदोलनाला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com