मावळ - मुंबई पुणे महमार्गावरील अहिरवडे फाट्यावर कोंबड्या चोरांनी बॉयलर कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो अडवून टेम्पो चालक व सहचालकास शस्त्रांचा धाक दाखवून कोंबड्यांचा टेम्पो लांपास केल्याची घटना पुढे आली आहे. या संदर्भात टेम्पो चालक यांनी कामशेत पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हे देखील पहा -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक जमाल अहमद अताउल्ला खान हे कोंबड्या घेऊन मुंबईला घेऊन जात असताना नायगावच्या जवळ एका पांढऱ्यां रंगाच्या बुलेटवर आलेल्या चार अनोळखी इसमांनी टेम्पो रस्त्यात अडवला. त्यानंतर त्यांनी टेम्पोत जबरदस्तीने घुसुन, क्लिनर व चालक यांना कोयत्याचा धाक दाखवत टेम्पो व त्यातील कोंबड्या असा एकुण बारा लाख तीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरी करून पुण्याच्या दिशेने पसार झाले.
या संदर्भात टेम्पो चालकाने कामशेत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कोंबड्यांचा टेम्पो हा पुणे नाशिक महामार्गाजवळ उभा असल्याची माहिती मिळाली आहे. त्यावरून कामशेत पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी चोरी गेलेला टेम्पो मोशी येथून ताब्यात घेतला आहे. गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध कामशेत पोलीस घेत आहेत.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.