Buldhana: नगरपरिषद कार्यालय जळगाव जामोद येथे विविध मागण्यासाठी लक्षवेधी आंदोलन

शहरामध्ये रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Buldhana News
Buldhana NewsSaam Tv

बुलढाणा - गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जामोद (Jalgaon Jamod) शहरामध्ये समस्यांचा खच वाढला आहे. याकडे नगरपरिषदेचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने प्रशासनाच लक्ष वेधण्यासाठी विविध प्रश्न घेत नागरिकांनी आंदोलन केले. यामध्ये शहरामध्ये रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हे देखील पाहा -

मागील वर्षी या जनावरांमुळे दोन-तीन लोकांन आपला जीव सुद्धा गमवावा लागला होता. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे महत्त्वाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर शहरातील सर्व महापुरुषाच्या पुतळ्याच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ती घाण स्वच्छ करावी, आणी शाळा क्रमांक २ मध्ये सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे व साफसफाई कर्मचारी उपलब्ध करून द्यावे.

Buldhana News
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 2.60 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त

ह्या मागण्यांकरिता नागरिकांनी अनेक वेळा तोंडी तसेच लेखी निवेदन देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या झोपलेले नगरपरिषद प्रशासनला जाग यावी यासाठी जळगावजामोद शहरातून युवकांनी मोर्चा काढून आंदोलन केले व नगरपालिकेचे लक्ष वेधले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com