Parbhani: जिल्हा सामान्य रुग्णालयात 50 रुग्णवाहिका सहा महिन्यांपासून धूळखात पडून!

जिल्हातील सर्वसामान्य कुटुंबाला वेळेवर रुग्णवाहिका Ambulance उपलब्ध व्हावी यासाठी लोकप्रतिनिधीने आपल्या निधीतून लाखोरुपये खर्च करत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या.
Parbhani: जिल्हा सामान्य रुग्णालयात 50 रुग्णवाहिका सहा महिन्यांपासून धूळखात पडून!
Parbhani: जिल्हा सामान्य रुग्णालयात 50 रुग्णवाहिका सहा महिन्यांपासून धूळखात पडून!राजेश काटकर

राजेश काटकर

परभणी: जिल्हातील सर्वसामान्य कुटुंबाला वेळेवर रुग्णवाहिका Ambulance उपलब्ध व्हावी यासाठी लोकप्रतिनिधीने आपल्या निधीतून लाखोरुपये खर्च करत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या, मात्र सदरील रुग्णवाहिका जिल्हा सामान्य रुग्णालयात District General Hospital धूळखात पडून आहेत त्यामुळे सर्वसामान्याना खाजगी रुग्णवाहिकेचा आधार घेत आर्थिकलूट होत आहे या गंभीर प्रकारा कडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष केले असून जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयाचा गलथान प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

हे देखील पहा-

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे साधारण पन्नास कोऱ्या-करकरीत रुग्णवाहिका गेल्या पाच सहा महिन्यापासून धूळ खात पडुन आहेत. कोरोना काळात खासदार, आमदार , पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी आप आपल्या विकास निधीतून रुग्णांच्या सेवेसाठी ह्या रुग्णवाहिका जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनास दिले होते .

मात्र या नवीन रुग्णवाहिका गेल्या सहा महिन्यापासून सुरूच करण्यात आल्या नाही. तांत्रिक दृष्ट्या कोणाची पासिंग नाही, कोणाचा इन्शुरन्स नाही, या कारणावरून ह्या रुग्णवाहिका सामान्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय येथून रेफर करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना खाजगी रुग्णवाहिके मधून आपल्या रुग्णाला नांदेड, औरंगाबाद आणि ईतर ठिकांनी न्यावे लागत आहे आणि त्यातून मोठा आर्थिक फटका ही सामान्यांना बसत आहे. याविरोधात आज परभणीत संभाजी ब्रिगेडकडून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आंदोलन करण्यात आलं. यावेळी बंद असलेल्या रुग्णवाहिका त्वरित सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा देण्यात आला आहे.

Parbhani: जिल्हा सामान्य रुग्णालयात 50 रुग्णवाहिका सहा महिन्यांपासून धूळखात पडून!
Oh... My God !!! मलिकांनी शेअर केले क्रांती रेडकर यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट्स...

कोविडच्या कालावधीत लोकप्रतिनिधीनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. सदरील रुग्णवाहिका ह्या वापरात असून आमच्या कडे वाहन चालकाची कमतरता आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला खाजगी कंत्राटदार वाहन चालकाचा आधार घावा लागतो तर कायम स्वरूपी वाहन चालक उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून कारवाईची प्रतीक्षा असल्याचे जिल्हारुग्णालयातील सिविल सर्जन डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी सागितले.

सर्वसामान्या डोळ्या समोर धूळखात पडलेल्या रुग्णवाहिका दिसत आहेत पण उपयोग होत नाही शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून ह्याची रुग्णवाहिकेची चाके कधी फिरतात ह्याची प्रतीक्षा सर्वसामन्य रुग्णाला पडली आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com