खायचं काय, हेही माहिती नाही? तर सरकार सांगणार!

खायचं काय, हेही माहिती नाही? तर सरकार सांगणार!

बुलढाणा ः राज्यात शिक्षणाचे प्रमाणा वाढले असले तरी आरोग्याबाबत लोक अद्यापि जागृत नाहीत. सकस आहाराअभावी अनेकजण कुपोषित राहतात. ग्रामीण भागात महिला आणि मुलांमध्ये हे प्रमाण मोठे आहे. रोज कोणता आहार घ्यायचा, याचीही माहिती नसल्याने आरोग्य समस्य उदभवतात. हे टाळण्यासाठीच सरकार नेहमीच उपक्रम राबवित असते.

राज्यासह देशभरात कुपोषणावर मात करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत "पोषण आहाराचा दोर आपल्या हाती" हा उपक्रम राबवला जात आहे. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीमध्ये विविध उपक्रम राबवित त्या माध्यमातून पोषण आहाराचे महत्त्व सर्वसामान्य जनतेला विशद करण्यात येणार आहे.

खायचं काय, हेही माहिती नाही? तर सरकार सांगणार!
यंदा उडीद पेरला असता तर... बघा, कसला भारी भाव मिळतोय!

बुलडाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत एक महिन्याच्या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोहिमेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना पोषण आहाराचे महत्त्व पटवून देण्याचा निश्चय आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे.

जे खाद्य पदार्थ, पालेभाज्या सहजासहजी उपलब्ध होतील असा आहार दररोजच्या जेवणामध्ये समावेश करायचा. निरोगी आरोग्यासाठी आरोग्य विभाग आता प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. यासाठी ज्या खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवले अशा सर्व खेळाडूंनी पोषण आहाराच्या संदर्भात जनजागृती करावी, असे आवाहनदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

त्या अनुषंगाने कुपोषणावर मात करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने पोषण आहाराचा दोर आता आपल्या हाती घेऊन जनजागृती करण्याला सुरुवात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com