आटपाडी प्रकरणात पडळकर आणि पाटलांचा जामीन फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक?

त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करीत गाडीची तोडफोड केली. त्यानंतर परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत.
आटपाडी प्रकरणात पडळकर आणि पाटलांचा जामीन फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक?
आटपाडी प्रकरणात पडळकर आणि पाटलांचा जामीन फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक?Saam TV

सांगली : सांगलीच्या आटपाडी राडा प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्या अर्जावर आज सुनावणी झाली असून न्यायालयाने तो अर्ज पेटाळला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. व्ही. जगताप यांच्यासमोर सुनावणी झाली. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडीत झालेल्या या राड्यामुळे तणावाचे वातावरण आहे. आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राजू जानकर यांनी केला होता. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करीत गाडीची तोडफोड केली. त्यानंतर परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत.

आटपाडी प्रकरणात पडळकर आणि पाटलांचा जामीन फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक?
गोपीचंद पडळकरांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे - देवेंद्र फडणवीसांची मागणी

दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. आमदार पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा, तर माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्यावरही बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडून आटपाडी तालुक्यात छापेमारी करण्यात आली. आमदार पडळकर, तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे राजू जानकर यांची आलीशान चार वाहने जप्त केली. त्यानंतर आमदार पडळकर आणि तानाजी पाटील यांनी अटक पूर्वसाठी धाव घेतली. त्यावर आज सुनावणी झाली असून तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे कोणत्याही क्षणी दोघांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com