शेतातील कारणावरुन कुटुंबावर सशस्त्र हल्ला

शेतीच्या धुरयावरुन दोन परिवारात हाणामारी करत सशस्त्र हल्ला चढविला असल्याने, या घटनेच्या विरोधात सिंदखेड़राजा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शेतातील कारणावरुन कुटुंबावर सशस्त्र हल्ला
शेतातील कारणावरुन कुटुंबावर सशस्त्र हल्लाSaam Tv

संजय जाधव

बुलढाणा : शेतीच्या farm धुरयावरुन दोन परिवारात family हाणामारी करत सशस्त्र हल्ला चढविला असल्याने, या घटनेच्या विरोधात सिंदखेड़राजा Sindkhedraja पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहानिचा व्हिडिओ Video देखील सोशल मीडियावर वायरल Viral झाला आहे. Attack on family for farm reasons

शेताचा धुरा व पेरणीच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या वादातून खरात कुटुंबीयांनी कुल्हाडीने केलेल्या, हल्ल्यात मध्ये सोळंके परिवारातील तिघे बापलेक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील डावरगाव Davargaon या गावामध्ये ही घटना घडली आहे.

हे देखील पहा-

मंदा प्रकाश सोळंके यानी दिलेल्या तक्रारीवरुन, पती प्रकाश सोळंके, सासरे बालासाहेब सोळंके, सासू जबर बेबी सोळंके, दीर गजानन सोळंके, जाऊ स्वाती सोळंके, मुलगा प्रशांत व मुलगी वैष्णवी, पुतणी दुर्गा, पुतण्या देवांश हे पेरणीसाठी स्वतःच्या शैतात गेले असता, बाजुच्या शेतात असलेल्या, खरात कुटुंबानी सोलंकी कुटुंबावर कुल्हाडीने व लाठ्या- काठया ने प्राणघातक हल्ला चढविला आहे. Attack on family for farm reasons

शेतातील कारणावरुन कुटुंबावर सशस्त्र हल्ला
कुटुंबावर सशस्त्र हल्ला करणाऱ्यावर कारवाईसाठी कुटुंबाचा उपोषणाचा इशारा

यामध्ये बेसावध असलेले सोलंकी परिवारातील तिघेजण गंभीर जखमी झाले, असून त्यांच्यावर औरंगाबाद Aurangabad येथील घाटी Ghati रुग्णालयात hospital उपचार सुरु आहे. खरात परिवाराविरोधात सिंदखेडराजा पोलिसात Police गुन्हा दाखल झाला असून, आरोपीना अद्याप अटक केले नाही. यामुळे जखमी प्रकाश सोलंकी यानी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यकडे निवेदन देऊन, आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com