नवापूर वनविभागाच्या दुटप्पी भूमिकेमुळे कारवाईला गेलेल्या पथकावर हल्ला...
Nandurbar NewsSaam Tv

नवापूर वनविभागाच्या दुटप्पी भूमिकेमुळे कारवाईला गेलेल्या पथकावर हल्ला...

बड्या लाकूड तस्करांना अभय तर केवळ देखाव्यासाठी लहान सुतार काम करणाऱ्यांवर वनविभागाच्या कारवाईने नागरिक संतप्त...

नंदुरबार - महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील नवापूर (Navapur) तालुक्यातील राखीव जंगलांमधून राजकीय नेते व वनकर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर लाकूड तस्कर करून जंगल संपुष्टात आलेला आहे. आजही बड्या लाकूड तस्करांना अभय देऊन छोट्या खाणी खिडक्या दरवाजे बनवून व्यवसायाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लहान सुतार कामगारांवर वन विभाग कारवाई करून दुटप्पी भूमिका निभावत असल्याने नवापुर तालुक्यातील बारी गावात कारवाईसाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर जमावाने घेराव घालत गाडीवर दगडफेक केली.

हे देखील पाहा -

या दगडफेकीत शासकीय गाडीचा काच फुटला आहे, तसेच वन विभागाचे वनरक्षक बिलाल रहमान शहा यांच्या हाताला मुक्का मार लागल्याने जखमी झाले आहे. या कारवाईत वनविभागाने तीन सागाचे चौपट, दोन दरवाजे आणि डिझाईन पाडण्याचे मशीन जप्त करत पथकावर केलेल्या हल्ला प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Nandurbar News
मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची दोन मतं कमी

महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नवापूर तालुक्यात आजही बड्या लाकूड तस्करांकडून मोठ्या प्रमाणावर जंगल तोड सुरु असतानाही मोठ्या व्यावसायिकांना अभय तर लहान सुतार व्यावसायिकांवर कारवाई करून वनविभाग दुटप्पी भूमिका निभावत असल्याने संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या पथकावर हल्ला केला आहे. वन विभागाने ठोस भूमिका घेऊन वृक्षतोड करणाऱ्या तस्करांवर निपक्ष पणाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com