Hingoli News: दरोडेखोरांकडून बंदुकीच्या धाकावर बँक लुटण्याचा प्रयत्न; हवेत गोळीबार!

बँकेतील कर्मचारी यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी हवेत गोळीबार करत काढला पळ
Bank robbery news Hingoli
Bank robbery news Hingoliसंदीप नागरे

संदीप नागरे

हिंगोली: हिंगोलीत दोन दरोडेखोरांनी बँकेत दरोडा (Robbery) टाकून बँक लुटण्याचा प्रयत्न केला आहे. वसमत तालुक्यातील चोंडी आंबा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला असून दरोडेखोर हे तोंडाला मास्क बांधून बँकेत पैसे काढण्याच्या निमित्ताने आले होते. (Bank robbery news Hingoli)

Bank robbery news Hingoli
Kapil Sharma Biopic: कॉमेडियन कपिल शर्माच्या बायोपिक चित्रपटाची घोषणा!

बँकेत (Bank) प्रवेश केल्यानंतर अचानक या दोघांनी त्यांच्या जवळ असलेल्या बंदुकी बाहेर काढून बँक मॅनेजर वर रोखल्या व बँकेतील सर्व कॅश त्यांच्या जवळ असलेल्या बॅगेत टाकून देण्यास सांगितले. मात्र, त्याच वेळी बँकेतील कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत बँकेतून पळ काढला. (Hingoli news today)

हे देखील पहा-

यातील एका दरोडेखोरांने थेट बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या दिशेने एक बंदुकीची गोळी चालवली मात्र सुदैवाने ही गोळी बँकेतील आडव्या काचावर लागल्याने मोठा अनर्थ टाळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरोडेखोर ज्या दिशेने पळून गेले त्या दिशेने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या अद्याप पर्यंत दरोडेखोर हाती लागले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेतील सीसीटीवी फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. (Latest Hingoli News In Marathi)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com