धक्कादायक : कुख्यात गुंडाने केला पाणीपुरी व्यावसायिकाच्या हत्येचा प्रयत्न

शहरातील एका कुख्यात गुंडाद्वारे हा हल्ला केला असल्याने भंडारा शहरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धक्कादायक : कुख्यात गुंडाने केला पाणीपुरी व्यावसायिकाच्या हत्येचा प्रयत्न
धक्कादायक : कुख्यात गुंडाने पाणीपुरी व्यावसायिकावर केले तीक्ष्ण हत्याराने वारSaamTV

भंडारा : भंडारा Bhandara शहरातील शासकीय जिल्हा रुग्णालयासमोरील एका पाणीपुरी Panipuri विक्रेत्यावरती तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहरातील एका कुख्यात गुंडाद्वारे हा हल्ला केला असल्याने भंडारा शहरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील पहा -

मूळचा उत्तर प्रदेशचा (UP) असणारा प्रेमसिंग राम कडोरे नरोंरिया हा भंडारा येथील संत कबवार्ड येथे राहत असून तो पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्या रोजच्या वेळेनुसार तो आपल्या शासकीय रुग्णालया समोरीच्या पाणीपुरीच्या ठेल्यावरवती गेला असता आरोपी विशाल ऊर्फ भिसी तोमरने प्रेमसिंग वरती तीक्ष्ण हत्याराने वार केले आणि तेथून पसार झाला आहे.

धक्कादायक : कुख्यात गुंडाने पाणीपुरी व्यावसायिकावर केले तीक्ष्ण हत्याराने वार
ST Strike : ST कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्यावं हीच काँग्रेसची भूमिका - नाना पटोले

दरम्यान या हल्ल्यामध्ये प्रेमसिंगच्या डोक्यावर झालेल्या जखमेमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन तो जागीच कोसळला घटनास्थळी असणाऱ्या काही लोकांनी जखमीला तात्काळ रूग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी आले आणि आरोपी विशाल ऊर्फ भिसी तोमरला शोधून अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र ही घटना जुन्या आपसीवादातन झाली असल्याच्या प्राथमिक अंदाज वर्तविन्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com