वसमत येथे मित्राच्या बहिणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरोपी अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत येथील गणेश पेठ भागातील विश्वनाथ आंबादास लासिनकर हा त्याच्या मित्राकडे सोमवारपेठेत जात होता.
वसमत येथे मित्राच्या बहिणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरोपी अटकेत
वसमत क्राईम न्यूज

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत शहरातील सोमवारपेठ भागात मित्राच्या विधवा बहिणीवर डोळा ठेवून अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मात्र त्याला विरोध झाल्याने आरोपीने त्याच्या घरातील सामानाची नासधूस केली. याप्रकरणी शुक्रवारी (ता. १६) पहाटे वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीस ताब्यात घेतले आहे. विश्वनाथ लासिनकर असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. Attempted- crime- on -a- friend's- sister- at -Wasmat-Accused- arrested- hingoli news

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत येथील गणेश पेठ भागातील विश्वनाथ आंबादास लासिनकर हा त्याच्या मित्राकडे सोमवार पेठेत जात होता. त्याच्या मित्राचे भाऊजी वारल्यानंतर त्याची बहीण तिथेच राहत आहे. मागील काही दिवसापासून विश्वनाथचा मित्राच्या बहिणीवर डोळा होता. मित्राच्या बहिणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर गुरुवारी (ता. १५) सायंकाळच्या सुमारास तो मित्राच्या घरी आला. त्यानंतर त्याने त्याच्या विधवा बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर घरातील इतर कुटुंब मदतीसाठी धावून आले. त्यामुळे रागाने विश्वनाथ याने घरातील टेबल, खुर्च्या, कपाट व इतर साहित्याची तोडफोड केली. त्यानंतर तेथून पळ काढला.

हेही वाचा - जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती धोकादायक वळणावर पोहोचली होती. परंतु जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व संपूर्ण टीमने मोठ्या कुशलतेने यावर मात करुन जिल्ह्याला कोरोना धोक्यातून बाहेर काढले.

दरम्यान पीडित महिलेने कुटुंबीयांसह वसमत शहर पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणात रितसर तक्रार दाखल केली. या प्रकरणात शुक्रवारी पहाटे वसमत शहर पोलीस ठाण्यात विश्वनाथ लासिनकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, हवालदार प्रशांत मुंढे यांनी भेट दिली. पोलिसांनी विश्वनाथ लासिणकार यास ताब्यात घेतले आहे. श्रीदेवी पाटील तपास करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com