Dhule : MIM आमदाराच्या अपहरणाचा प्रयत्न; फारुख शहा यांची पोलीस संरक्षणाची मागणी

Political Crisis In Maharashtra : याबाबत आमदार फारुख शहा यांनी पोलिसांत तक्रार दाखल करुन पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे.
Dhule : MIM आमदाराच्या अपहरणाचा प्रयत्न; फारुख शहा यांची पोलीस संरक्षणाची मागणी
Attempted kidnapping of Dhule MIM MLA; Farooq Shah's demand for police protectionभूषण अहिरे

मुंबई: राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना सर्वच पक्षाच्या आमदारांना अनन्यसाधारण महत्वं प्राप्त झालंयं. एकनाथ शिंदेंनी (Ekanath Shinde) बंड केल्यानंतर आपल्यासोबत शिवसनेचे ४० आमदार आणि अपक्ष तसेच इतर छोट्या पक्षातले १० आमदार आहेत. सत्तास्थापनेसाठी जास्तीत जास्त आमदारांना आपल्यासोबत घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. अशात धुळे जिल्ह्यातू एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. धुळे शहराचे आमदार फारुख शहा (MIM MLA Farooq Shah) यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. याबाबत आमदार फारुख शहा यांनी पोलिसांत तक्रार दाखल करुन पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे. (Attempted kidnapping of Dhule MIM MLA; Farooq Shah's demand for police protection)

हे देखील पाहा -

सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय वातावरणाचे पडसाद धुळ्यात देखील उमटताना दिसून येत आहेत. एआयएमआयएम पक्षाचे धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांनी गुरुवारी रात्री आपले अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याता धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. या संदर्भात आमदार फारुख शहा यांनी पोलीस प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापल्याने आमदारांना अतिमहत्व प्राप्त झाले आहे. याआधीही इतर आमदारांकडून देखील आपले अपहरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप झाला आहे. यात मुख्य नाव म्हणजे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील. शिवसेनेच्या या दोन्ही आमदारांनी आपलं अपहरण झाल्याचा दावा केला होता.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com